पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १२० येथे असा प्रश्न उपस्थित होतो की, यूरोपला मानवी विकासाच्या आघाडीवर नेऊन सोडणा-या त्याचप्रमाणे नव्या वैचरिक घटना व नवी सांस्कृतिक मूल्ये यूरोपात निर्माण करणा-या उपरोक्त सामाजिक शक्ति हिंदुस्थानात का प्रादुर्भूत झाल्या नाहीत? याचे उत्तर शोधून काढण्यासाठी आपल्यामागील इतिहासाकडे वळले पाहिजे. ब्रिटिश आक्रमणामुळे त्या सामाजिक शक्ती मुळातच खुरडल्या गेल्या, हे खरे असले तरी ब्रिटिशांची सत्ता येथे अवघी दोनशे वर्षेच आहे. त्यापूर्वी त्यांचा येथे पादुर्भाव का झाला नाही ? ब्रिटिशापूर्वी झाला तरी आपला देश परचक्रांकित होताच. सर्वसाधारणपणे गेली सातशे वर्षे आपला देश परकीय आक्रमणाखाली आहे. त्यामुळे त्याची खच्ची दोऊन तद्गत समाजाच्या विकासक्रमास प्रचंड अडथळे आले. त्यामुळे देशातील आर्थिक शक्तींचा कोंडमारा होऊन यूरोपातल्याप्रमाणे सरंजामशाहीला तीतील समाजरचना, वैचरिक घटना, जीर्ण संस्था, सांस्कृतिक मूल्ये इत्यादीसह उलथून टाकण्यास समर्थ अशी प्रभावी भांडवलशाही येथे विकास पावू शकली नाही.सारांश,याप्रमाणे शेकडो वर्षे हिंदी समाज परचक्राच्या कोंडीत असता यूरोपमध्ये वैचारिक क्रांतीची प्रचंड चळवळ ( The great renaissance movement ) क्रांत्यामागून क्रांत्या उठवून देत होती. परचक्राच्या सातत्यामुळे हिंदुस्थानास वैचारिक क्रांतीची चळवळ निर्माण करता आली नाही; जगाच्या इतर प्रदेशात ती दाणादाण उडवून देत असता, बाहेरच्या देशातून तिला येथे आणून तिचे बी येथे रुजविण्याचे सामर्थ्यही आपल्या देशात राहिले नाही. पुढे ब्रिटिश सत्ता येथे स्थिर झाल्यानंतर तर हिंदी सामाजिक आर्थिक शक्तींचा अधिकाधिक कोंडमारा होऊ लागला. ब्रिटिशानी अर्वाचीन सुधारणेची आगगाड्या तारायंत्रे इत्यादि बाह्य चिन्हे या देशात प्रचलित केली; पण अर्वाचीन क्रांतिप्रवण विचार प्रवाहापासून आपल्या देशातील सुशिक्षितास अलग ठेवण्याची खबरदारी घेतली. अर्वाचीन पुरोगामी विचारापासून अलिप्त