पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ क्रांतिवादाची पार्श्वभूमि मानवी सुधारणा आणि सांस्कृतिक प्रगति ( civilisation and cultural progress ) या दृष्टीने विचार केल्यास पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत हिंदुस्थान आणि यूरोप हे दोन्ही भूप्रदेश सुधारणा आणि संस्कृति यांच्या एकाच झणजे समसमान पातळीवर होते. दोहोकडील विचारसरणींचा विकास एकाच धर्तीवर आणि सारख्याच वेगाने होत गेला. यूरोपमधील जुनी ग्रीक विचारसरणी ह्मणा, अगर हिंदुस्थानातील जुनी सांख्य कणादांची तत्त्वज्ञाने-किंबहुना औपनिषदिक विचारसरणी ह्मणा, दोन्हीही प्रमुखपणे भौतिकवादीच आहेत. दोहोंचे अधिष्ठान चिकित्साबुध्दि ( spirit of enquiry ) हीच आहे. पण पुढे केवळ चिकित्सा बुध्दीच्या योगाने दोहोकडील मानवाना नैसर्गिक दृश्यांच्या भौतिक कारणांचा उलगडा होईना, ह्मणून प्राच्य आणि पाश्चात्य मानवानी नैसर्गिक दृश्यांच्या बुडाशी । दैवी शक्ती कल्पिल्या, येथपासून दोहोकडील मानवांच्या मनावर धार्मिक विचारसरणीचा पगडा बसू लागला. मानवांची स्वतंत्र प्रतिभा धार्मिक विचारसरणीच्या कोंडीतच अडकून राहिली. ती कोंडी कालांतराने ह्मणजे १५ व्या व १६ व्या शतकात यूरोपच्या क्षितिजावर नव्याने उदित होणा-या क्रांतिप्रवण सामाजिक शक्तीनी फोडली. या गोष्टीचा असा परिणाम झाला की चिकित्साबुध्दाचे पुनरुज्जीवन झाले;शब्दप्रामाण्य मागे पडून बुध्दिप्रामाण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले; धर्माचे सिंहासन विज्ञानाने बळकाविले. यानंतर युरोपात घडून आलेल्या वैचारिक क्रांतीचा संक्षिप्त इतिहास वर विदित केलेलाच आहे. त्या इतिहासात नवोदित सामाजिक शक्ती कोणत्या याचेही पण थोडेसे दिद्र्शन केलेले आहे. त्या सामाजिक शक्ती ह्मणजे नवोदित व्यापारी मध्यम वर्ग आणि त्याची मोठी आवृत्ति अशी यूरोपीय भांडवलशाही ही होत. या सामाजिक शक्तींचा पुरेसा विकास हिंदुस्थानात झाला नाही; ह्मणून तेथे बुध्दिवादाचा उगम होऊ शकला नाही; आणि विज्ञान युगास प्रारंभही पण झाला नाही.