पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ११८ नालाही विश्वाच्या सर्व रहस्याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. परंतु विज्ञानप्रणीत ज्ञानाची निश्चिती अनुभवसिद्ध आहे. जगात अज्ञेय असे काहीच नाही. आपले ज्ञान हे अपूर्ण आहे, पण आपली ज्ञातृत्वशक्ति हीही अमर्याद आहे. विज्ञानाने मात्र पूर्ण ज्ञान व अनाद्यनत स्वरूप यांचा बोजवारा उडविलेला आहे यात शंका नाही. विज्ञानप्रणीत ज्ञानाचा निष्कर्ष हा की, जगात स्थिर व चिरस्थायी असे काही नाही. अमर्याद बदल हा विश्वाचा धर्म आहे. विश्वामध्ये एकसारखी दृग्गोचर होणारी स्थित्यंतरे ही देखील निसर्गातील गुणधर्मानुसारच चाललेली आहेत. | विज्ञानाच्या विकासाचा एवढा मात्र परिणाम झाला आहे की तत्त्वज्ञानाने आपले क्रियाशून्य व भोंगळ कल्पनाजालाचे स्वरूप टाकून दिले व विज्ञानांचे विज्ञान (Th: science of all sciences ) ही श्रेष्ठ पदवी पटकावून तदनुरूप आपल्या क्रियापूर्ण व तेजस्वी पराक्रमाचा झेंडा फडकविला. सारांश, विज्ञान हे तत्त्वज्ञानाशी समरस होऊन तत्त्वज्ञान हे सर्व विज्ञानांचा परिपाक बनलेला आहे. अशा त-हेची वैचारिक क्रांति हिंदुस्थानात घडून आल्याशिवाय हिंदुस्थानात राज्यक्रांति व तदुत्तर समाजविकास ही घडून येणार नाहीत, यूरोपात ही वैचारिक क्रांति घडवून आणण्यास अनेक गैलिलियो, कोपरनिकस ब्रनोसारख्या यूरोपीय विज्ञानविशारदाना अनेक दिव्यातून मार्ग आक्रमण करावा लागला. त्यामुळे यूरोप खंड हे आज जागतिक संस्कृति आणि प्रगति यांच्या अग्रभागी विराजमान झालेले आढळून येते. हिंदुस्थानात अद्यापही बुद्धिवादप्रणीत विज्ञान युगाचा उदय झालेला नाही. हिंदुस्थानातील वातावरण अंधश्रध्दा धर्मभोळेपणा आणि वेडगळ सामाजिक आचारविचार यांच्या दुर्गधानी व्यापलेले असे अजूनही नजरेस पडते. असे का असावे याचा थोडासा विचार झाला पाहिजे. याबरोबरच हिंदी स्वातंत्र्य आणि वैचारिक क्रांति यांचा अन्योन्यसंबंध काय आहे याचाही येथे अंगळ खल होणे अप्रस्तुत नाही.