पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ क्रांतिवादाची पार्श्वभूमि समाजावर चिरस्थायी करण्यासाठी निसर्गातीत तत्त्वाच्या अधिष्ठानाची जरूरी भासू लागली. परंतु सगुण परमेश्वर व जुन्या वेडगळ धर्म समजुती यांची पुनः प्रतिष्ठापना करण्यास भांडवलदार वर्गाच्या प्रगत व सुसंस्कृत मनास लाज वाटू लागली, ह्मणून त्या वर्गाने धर्माच्या आसनावर अर्वाचीन अध्यात्मवादाची स्थापना करून, विज्ञानाने ज्याच्या ठिकन्या उडवून दिल्या होत्या, अशा वैयक्तिक सगुण ईश्वराच्या जागी निर्गुण ब्रह्माची योजना केली. कॅन्टने तर इंद्रियजन्यज्ञान व स्फूर्तिजन्यज्ञान ( Pheno nenal and nomenal experience ) अशी ज्ञानाची विभागणी केली. इंद्रियाला गोचर होणा-या वस्तूपलीकडे वस्तुतत्व ( the thing in itself ) असून अखिल विश्वापलीकडे अध्यात्मतत्व असलेच पाहिजे असे त्याने अध्यात्मवादाचे कल्पनाजाल पसरले. तथापि अध्यात्मवादाचा हा डोलारा टिकून राहणे शक्य नव्हते. कॅन्टच्या लागोपाठ हेगेल पुढे आला. त्याने मूलभूत आत्मतत्वाचा पुरस्कार केला होता तरी विश्वाच्या विकासाची उपपत्ति त्याने विरोधविकासाच्या नवीन तर्कपद्धतीने लाविली. या नूतन तकपद्धतीचे शस्त्र हाती घेऊन, दलितांच्या तत्वज्ञानाचे प्रणेते व सर्व विज्ञानांचे बोलते चालते ज्ञानकोश असे मावर्स व एंजल्स हे सव्यसाची वीर पुढे सरसावले व त्यानी अध्यात्मवादाची पाळेमुळे खणून कादिली. त्यांचे विशिष्ट कार्य हे की, त्यानी तीनशे वर्षे सतत चालू असलेल्या विज्ञानशोधांच्या अनुरोधाने जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मानवाना प्राप्त करून दिली. | या मिळालेल्या नवीन भौतिक दृष्टीच्या योगाने, निसर्ग, जीवन इतिहास व समाज यांच्या बुडाशी प्रेरक अशी कोणतीच गूढ व निसर्गातीत शक्ति नाही; आपणच आपल्या नशिबाचे धनी आहोत, आपणच आपल्या प्रयत्नानी प्रगतीचे आत्यंतिक शिखर गाठले पाहिजे इत्यादि आत्मकर्तृत्वाची व आत्मवैभवाची जाणीव मानवात प्रादुर्भूत होते. विज्ञा