पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९) ऐकायला मोठी रम्य वाटते. पण ती अधश्रद्धाळू जनतेला, ज्याना ह्मणून इतिहासाचे थोडे तरी ज्ञान आहे व आर्थिक शक्तींच्या प्रभावाची कल्पना आहे,त्याना या विचार परंपरेतील खुळचटपणा निसंदिग्धपणे कळून चुकेल. चरख्याने जगात अहिंसा प्रस्थापित होऊन शांति नांदते असे ह्मणावे, तर चरख्याचा शोध हा काही अर्वाचीन नाही. इंग्रज येथे येण्यापूर्वी घरोघरी चरखे होते. मग त्यावेळी युद्ध मारामा-यांचा सर्वत्र सुकाळ का होता ? स्वातंत्र्य का गेले ? जगभर निदान हिंदुस्थानात तरी शांतीचे साम्राज्य कसे पसरले नाही ? पूर्वी चरखा असता जे स्वातंत्र्य गेले ते आता पुनः चरखा आल्यानंतर, चरखारूप जादूने प्राप्त झाले अशी कल्पना केली तरी, टिकेल ह्मणून कशावरून ? आता विधायक कार्यक्रमाच्या आचरणाने बहुजनसमाजाचे सर्व आर्थिक प्रश्न सुटतील असा जो गांधींचा अभिप्राय आहे त्यासंबंधी साहजिकच असा प्रश्न उद्भवतो की, विधायक कार्यक्रम जर हिंदुस्थानच्या सर्व आर्थिक दुःखांचे निरसन करतो तर हिंदुस्थानास स्वातंत्र्याची तरी काय गरज आहे ? शिवाय या अभिप्रायानुसार हिंदुस्थानच्या व्हासाची जबाबदारी साम्राज्यशाही पिळणुकीवर पडत नाही. तर ती आपले ग्रामीण अर्थकारण सोडून शहराकडे धाव घेणा-या हिंदी जनतेवर पडते ! आपले राज्यकर्ते झाले तरी हिंदी व्हासाची जबाबदारी हिंदी लोकावरच टाकतात. हिंदी जनता न भांडतान झगडता, शहाणेसुरतेपणे नांदू लागली ह्मणजे आपले हिंदुस्थानातील कार्य संपले असा पोक्त उपदेश ब्रिटिश लोक सतत करीत आले आहेत. व्यवहारात गांधींचाही उपदेश याच मासल्याचा आहे. तुह्मी दुःखामध्ये आनंदाने दिवस कंठा; दारिय झणजे अध्यात्मिक मनोरथ पूर्ण करणारा कल्पद्रुम आहे असे समजा; ह्मणजे राजकीय दास्य आणि आर्थिक पिळणूक हीं नुसती भासमात्र आहेत असे तुह्मास कळून येईल अशी गांधीजींची अध्यात्मप्रवण शिकवण आहे. . २