पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ११६ व इंद्रियातीत असे जे ज्ञान ते संपूर्ण संशययुक्त असे सावेश प्रतिपादन केले व ईश्वरज्ञानाविरुद्ध संशयवादाची पताका उभारली. अर्थातच तर्कशास्त्राच्या कसोटीस लावल्याबरोबर धर्म व ईश्वरवाद यांच्याखाली अदळपणे मिरवीत असलेले सिंहासन डळमळू लागले. साहजिकच आदितत्वाबद्दल युरोपीय समाजामध्ये साशंक वृत्ति पसरू लागली; व समाज हा आपल्या नेहमीच्या व्यवहारात विज्ञानावरच अधिकाधिक विसंबून राहू लागला. ' विज्ञानाचे याप्रमाणे मानवी मनावर प्रभुत्व बसत चालले तरी ज्या नैसर्गिक दृश्यांच्या कारणांचा भौतिक उलगडा होत नसे, अशांचे कर्तृत्व निसर्गातीत अशा परमेश्वरी तत्त्वावर लादण्यात येऊ लागले. उदाहरणार्थ, वास्तवविज्ञान, रसायनविज्ञान आणि ज्योतिष्यविज्ञान या तीन्ही शास्त्रात विज्ञानपंडितांची भौतिक दृष्टी सफाईने वावरत होती. तथापि प्राणीवनस्पतिशास्त्र व मानसशास्त्र यात अध्यात्मवाद व आस्तिक्यवाद यांचा गोंधळ कायमच दोता. पण या शास्त्रातही पुढे प्रगति होऊ लागली. मानव प्राण्याचा उदय हा खालच्या दर्जाच्या प्राण्यापासून झाला असून सर्व सजीव सृष्टी ही देखील एका मूलभूत जड द्रव्यापासून उत्पन्न झाली असे शोध बाहेर पडू लागले. संकल्पविकल्पात्मक मन हे सुद्धा मेंदू या जडेंद्रियाचे कार्य आहे हे सिद्ध करण्यात आले. याप्रकारे विश्वाची उत्पत्ति व स्थिति यांचा परमेश्वराशी काही एक संबंध नाही, असे विज्ञानाच्या विविध अंगानी प्रस्थापित केले व परमेश्वरावरील श्रद्धेची इतिश्री झाली. | परमेश्वरी इच्छेवर अधिष्ठित झालेली सरंजामी सत्ता व समाजव्यवस्था ढासळून पाडण्यास ईश्वरी साम्राज्याविरुध्द बंड करणाच्या विज्ञानप्रणीत विचारक्रांतीचा भांडवलदार वर्गाला अनुपम उपयोग झाला. पण जेव्हां तो वर्ग सत्ताधीश बनला, तेव्हा त्याला आपली सत्ता