पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ क्रांतिवादाची पार्श्वभूमि दृष्टिकोण आमूलाग्र बदलला पाहिजे.युरोपीय वैचारिक क्रांतीचा इतिहास येथे देण अस्थानी होणार नाही. कारण त्यायोगे यूरोप पुढे कसा गेला, हिंदुस्थान मागे का राहिला आणि यूरोपच्या पाऊलावर पाऊले टाकीत भरधाव वेगाने दौड हिंदुस्थानास कसे अवश्य आहे, याची स्पष्ट कल्पना हिंदी बुद्धिजीवि जनतेच्या बुद्धीस पटून मनावर बिंबून राहील. गॅलिलिओ, कोपरनिकस आणि केप्लर यांचे युगप्रवर्तक शोध बाहेर पडल्यापासून परमेश्वरावरील श्रद्धा, तजन्य तत्वज्ञान, जीवन व विश्व यांच्याकडे पाहण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन यांचा पायाच यूरोपमध्ये डळमळू लागला. नैसर्गिक दृश्यांच्या मूलभूत कारणांचा भौतिक उलगडा उपर्युक्त शोधामुळे ज्यावेळी होऊ लागला, त्यावेळी धर्मप्रणीत, दैविक व पारलौकिक कल्पनांचा व विचारसरणीचा निरास झाला व वैचारिक क्रांति घडून आली. विश्व, जीवन, समाज व इतिहास यांच्याबद्दलच्या दृष्टि कोनात आमूलाग्र बदल घडून आला. या विचार क्रांतीचे पर्यवसान १८।१९ व्या शतकातील यूरोपीय क्रांत्यात झाले. व तेथूनच पुढे अर्वाचीन संरकृतीच्या युगास प्रारंभ झाला. प्रारंभी फ़ॉन्सीस बेकन व डेका यानी प्रयोगजन्य विज्ञानावरच तत्वज्ञानाची उभारणी करण्याची प्रथा सुरू केली. ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्न बुद्धिवादाच्या कसास लावूनच सोडविला पाहिजे असे प्रतिपादन करून धर्माच्या मूळावरच कुटारीचा प्रहार केला. कारण धर्म हा श्रद्धाप्रणीत असल्यामुळे धर्माला बुद्धिवादात आणून सोडणे झणजे माशाला पाण्यातून बाहेर काढण्यासारखेच आहे. या बेकनच्या काळापासूनच धर्म व विज्ञान यांच्या लढ्याला सुरवात झाली. विज्ञानाने अनेक पराक्रम गाजवून अनेक दिव्य असे विजय संपादन केलेले आहेत. तथापि अंतिम विजय त्याला अद्याप मिळवावयाचा आहे ! बेकनचा समकालीन डेकाट याने बेकनच्याही पुढे पाऊल टाकले. याने इंद्रिनजन्य ज्ञान तेवढेच खरे, विश्वसनीय