पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ११४ तद्वत् राष्ट्रीय स्वातंत्र्याचे बी आपल्या देशात का रुजत नाही ? राष्ट्रीय चळवळीची प्रचंड आंदोलने एका चुटकीसरशी दडपून टाकण्यात आली. याला म. गांधी ही एकच एक व्यक्ति कारणीभूत झाली असे ह्मणणे इतिहासक्रमाविषयीचे अज्ञान प्रगट करण्यासारखे आहे. त्यास गांधींचे तत्वज्ञान जबाबदार धरावे तर गांधींचे तत्त्वज्ञान तरी या देशात फोफावून कसे थैमान घालू शकते याचा मूलग्राही विचार होणे जरूर आहे. गांधींचे तत्वज्ञान हे काही हिंदुस्थानात नव्याने आणलेले नाही. हिंदुस्थानच्या प्राचीन परंपरेवरच ते आधारलेले आहे. याचा अर्थ असा की सामाजिक विकासक्रमामधील ज्या अवस्थेत प्राचीन परंपरेची व त्यावर रचिलेल्या गांधींच्या मध्ययुगीन तत्वज्ञानाची आणि आचारक्रमाची होळी केली जाते, त्या अवस्थेपर्यतच आपला हिंदी समाज पोचलेला नाही.हाणजे श्रद्धायुगातून बुद्धियुगामध्ये आपल्या समाजाने अद्याप पदार्पणच केलेले नाही. हेच जनभाषेतच सांगावयाचे झणजे आपला समाज अद्याप श्रद्धाळू आहे, तो बुद्धिवादी नाही. * अंधश्रद्धेचे युग सरो, बुध्दिवादाचा विजय असो' ही बेकनप्रणीत वैचारिक क्रांतिच आपल्या देशात घडून आलेली नाही. ती यूरोपमध्ये तीनशे वर्षांपूर्वीपासूनच घडून येऊ लागली हाणून अर्वाचीन विज्ञानयुग, यंत्रप्रति भांडवली संस्कृति, आजची यंत्रप्रधान समाजव्यवस्था इत्यादींचा उदय यूरोपमध्ये दीड-दोनशे वर्षांपूर्वीच होऊन ती एकसारखी उत्कर्ष पावू लागली. यूरोपीय समाज हा विकासक्रमाच्या वरच्या पायरीवर उक्रान्त झाला. तेव्हा हिंदुस्थान देशास जर उत्क्रांत यूरोपच्या पंक्तीस जाऊन बसा. वयाचे असेल तर यूरोपातल्याप्रमाणेच येथेही बुद्धिवादाचे प्राबल्य वाढले पाहिजे. अंधश्रद्धा किंवा शब्दप्रामाण्य यांचे स्थान बुध्दिप्रामाण्याने पटकाविले पाहिजे. धर्माच्या सिंहासनावर विज्ञानाची प्रतिष्ठापना झाली पाहिजे. याचाच अर्थ वैचारिक क्रांति घडून आली पाहिजे. हिंदी बुध्दिजीवि जनतेचा