पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ गांधीवाद हितसंबंध, प्रेरणा आणि आकांक्षा यावर आधारलेल्या पुढारीपणाच्या अभावी सत्याग्रह संग्राम थंडावला. * पुनश्च हरिः ॐ' ह्मणून भुलाभाई, सत्यमूर्ति इत्यादि प्रछन्न नेमस्तांच्या हाती काँग्रेसचे राजकारण गेले; आणि काँग्रेसच्या अनेक ठरावानी धिःकृत असा १९३५ चा सुधारणा कायदा मनसोक्त राबविण्यात आला. तात्पर्य, पुरोगामी राष्ट्रवादी नेमस्त घ्या, किंवा प्रतिगामी राष्ट्रवादी जहाल घ्या, दोहोंच्या कपाळी साम्राज्यविरोध लढ्यात शरणागति ही ठरलेली ! हेच गेल्या तीन तपाच्या राष्ट्रीय राजकारणाने सिद्ध झाले. आता सांप्रतचे युद्ध सुरू झाल्यानंतर अहिंसेच्या नावाखाली चवथ्या फार्सवजा युद्धविरोधी लढ्यास तोड जुंपलेले आहे. त्यात गांधीवादी नेतृत्वाचे दिवाळे वाजलेले जनतेस स्पष्ट कळून येत चालले आहेच; ते नेतृत्व काँग्रेसला युद्धविरोधाची भूमिका घेण्यास भाग पाडून फॅसिझमूला मदत करीत आहे. ह्मणजेच त्याने हुकूमशाहीशी लढणा-या जगातल्या सर्व लोकशाही शक्तीविरुद्ध लढा चालू ठेवलेला आहे. यावरून प्रतिगामी राष्ट्रवाद अर्थात् गांधीवाद कसा क्रांतिविरोधी आहे हे स्पष्ट झाले आहे. या क्रांतिविरोधाचे पर्यवसान स्वातंत्र्य लढा चालविणा-या काँग्रेसच्या निर्माणावस्थेत झाले आहे. सारांश,जर्मनीत ज्याप्रमाणे महायुद्धोत्तर घडून आलेल्या कामगारांच्या दोन तीन क्रांत्यांचा नाझीवादाने निःपात केला. तेच कार्य हिंदुस्थानात बहुजनसमाजाचे उठाव अहिंसेच्या नावाखाली जिरवून गांधीवादाने केले आहे. जर्मनीतील अतिमानव (Superman) हिटलर आणि हिंदुस्थानातील अतिमानव म. गांधी या दोघांचे कार्य आणि वैचारिक भूमिका ही एकच आहेत. परिस्थिति भिन्नतेमुळे हिटलरने जे काम जर्मनीत हिंसेने केले. तेच कार्य गांधीजीना हिंदुस्थानात अहिंसेने करावे लागत आहे. जगांतील क्रांतीचा पुरा विध्वंस करण्याचा दोघानी आता चंग बांधलेला सध्या दृष्टोत्पत्तीस येतो, अर्थात् बहुजनसमाजास राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक मुक्तता प्राप्त करून देणा-या क्रांतिवादी लोकपक्षाची