पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ११० हाने तो राबवू लागली. देशातील बहुजनसमाजाची फसगत झाली. सारांश, प्रतिगामी राष्ट्रवादाचे नेतृत्व अपेशी ठरले. या राष्ट्रवादाच्या नेतृत्वाखाली तीन वेळा साम्राज्यविरोधी लढा देण्यात आला, पण तीनही वेळा राष्ट्रीय शक्ती पराभूत झाल्या. प्रतिगामी राष्ट्रवादाने टिळक अरविंदबाबूंच्या नेतृत्वाखाली साम्राज्यशाहीशी पहिला लढा दिला. नेमस्तापुढे भाकरीचे तुकडे फेकून जहालाना झोडा' या धोरणाचा मोलॅप्रभृति ब्रिटिश मुत्सद्यानी अवलंब करूस राष्ट्रीय चळवळ मोडून टाकली. अखेर पराभूत झालेल्या प्रतिगामी राष्ट्रवादी शक्ती सनदशीर राजकारणाच्या रूळावर आल्या. जहालांची ही सनदशीर प्रवृत्ति आपल्या मरणापूर्वी लो. टिळकानी माँटफर्ड सुधारणा राबविण्याच्या दृष्टीने काढलेला लोकशाही स्वराज्यपक्ष आणि त्याचा जाहीर नामा यात प्रतिबिंबित झालेली स्पष्टपणे दिसून येते. दुसरा लदा काँग्रेसमधून म. गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसात्मक असहकारितेच्या रूपात देण्यात आली. या चळवळीची वाताहत कशी झाली आणि त्या चळवळीच्या अवशेषातून सनदशीर स्वराज्य पक्ष कसा निर्माण झाला याचे विस्तृत विवेचन वर येऊन गेलेलेच आहे. यावेळीसुद्धा ब्रिटीश साम्राज्यशाहीने पुनरपि वरिष्ठ हिंदी भांडवलदार वर्गास आर्थिक सवलती देऊन विकत घ्यावयाचे व त्याला इतर राष्ट्रीय शक्तीपासून अलग करून त्या शक्तीवर दडपशाहीचा बडगा सतत चालू ठेवावयाचा याच मार्गाचा अवलंब केला. तिसरा लदा १९३० सालच्या सत्याग्रह संग्रामाचा. या समयी धूर्त साम्राज्य शाहीने गोलमेज परिषदेचा डाव टाकून हिंदी भांडवलशाहीस वश करून घेतले आणि त्यांच्या काँग्रेसमधील हस्तकाकरवी काँग्रेसला गांधी आयर्विन कराराच्यारूपाने ब्रिटीश सरकारपुढे लोटांगण घालण्यास लाविले. तरीसुद्धा काँग्रेसमधील क्रांतिकारी शक्तीनी आपला लढा चालू ठेवलाच. परंतु क्रांतिवादी नेतृत्वाच्या अभावी ह्मणजे बहुजनसमाजाचे