पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ११२ स्थापना होणे अवश्य झाले. ह्मणून कॉ. रॉय यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करणा-या क्रांतिवादी काँग्रेस–जनसंघाला ( The league of Radical congressenen ) काँग्रेस सोडून देणे भाग पडले. त्याने नवा क्रांतिवादी लोकपक्ष ( Radical Democratic Party ) स्थापन केला. तेव्हा क्रांतिवाद ह्मणजे काय, त्यांचे या देशात बीजारोपण कसे झाले; त्याचे तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम ही काय आहेत आणि अखेर क्रांतिवादी नेतृत्व बहुजनसमाजास स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यास कसे पात्र आहे इत्यादि साद्यंत विवेचन करणे याउपर अवश्य होते. पण क्रांतिवादाची पार्श्वभूमि ह्मणजे वैचारिक क्रांति ही हिंदुस्थानात घडून येणे कसे अवश्य आहे याचा थोडासा ऊहापोह तत्पूर्वी करणे यथानुक्रम ठरते. तिकडे आता वळू. ।। ।। ।