पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६९ गांधीवाद काँग्रेसमधील हिंदी भांडवलशाहीच्या हस्तकानी चळवळ थांबविली आणि गांधी-आयर्विन करार घडवून आणला. म. गांधी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी ह्मणून दुसन्या गोलमेज परिषदेस जाण्यास सज्ज झाले. गोलमेज परिषदेत म. गांधीनी साम्राज्य सरकारशी * सन्माननीय ' समेट घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.परंतु हिंदुस्थानातील शेतकरी (गोलमेजपरिषदेत हिंदी भांडवलशाहीस काही हक्क देऊ केल्याने ) समाधान पावणे शक्य नव्हते. व्यापाराच्या मंदीमुळे शेतकरी हवालदील झाला होता. कामकरीही संघटित बनून साम्राज्यविरोधी लढ्यात प्रामुख्याने भाग घेण्यास पुढे सरसावत होता. कनिष्ठ मध्यम वर्गीय बुद्धिजीवि हाही शेतकरी कामकन्याना क्रांतिकारी मार्गदर्शन करून त्यांचे प्रत्यक्ष नेतृत्व पत्करण्यास बद्धपरिकर झाला होता. अशा परिस्थितीत साम्राज्यशाहीशी समेट घडून येणे अशक्य होते. अर्थात् म. गांधीजी गोलमेजपरिषदेहून परतून हिंदुस्थानच्या किना-यावर पदार्पण करतात न करतात, तोच चळवळीस तोंड लागले. पुनश्च सार्वत्रिक कायदेभंग, सरकारी वटहुकुमांची सरबत्ती, धरपकडीचे सत्र इत्यादीनी हिंदुस्थानातील वातावरण भरून गेले. पण पुढे १॥२ वर्षातच चळवळ ओसरली. मॅकडोनेल्डच्या जातीय निवाड्यात अस्पृश्याना स्वतत्रं मतदारसंघ उभारण्याची योजना असल्यामुळे म. गांधीनी प्राणांतिक उपवास सुरू केला आणि राजकीय चळवळीवरून जनतेचे लक्ष हरिजनचळवळीकडे ओढून घेण्यात आले. नाही ह्मणायला म. गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने वैयक्तिक कायदेभंग पुकारला. पण त्यात यश येण्याचे बाजूलाच राहिले, उलट सत्याग्रह संग्रामाचा बोजवारा उडाला. तात्काळ काँग्रेसच्या राजकारणाचे तारू प्रचंड चळवळीवरून सनदशीर मार्गाच्या बंदगकडे येऊन पुनः थबकले. पुढे काँग्रेसने निवडणुक लढविल्या; सर्वत्र कायदेमंडळात काँग्रेसचे बहुजन झाले; आठ प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे बनली. १९३५ चा सुधारणा कायदा मोडू पाहणारी काँग्रेस अत्यंत उत्सा