पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १०८ ध्येय निःसंदिग्ध केले. म. गांधीना स्वेच्छेविरुद्ध या ध्येयाला मान्यता देणे भाग पडले. वसाहतीच्या स्वराज्याने बहुजनसमाजाची पिळणूक थांबण्याजोगी नाही. उलट त्यामुळे पिंळणूक तीव्रतर होते. कारण वसाहतीच्या स्वराज्यात हिंदी भांडवलदार वर्ग हा साम्राज्यशाही पिळणुकीत भागीदार बनतो. तेव्हा संपूर्ण स्वातंत्र्य याचा खरा अर्थ बहुजनसमाजाची पिळणुकीपासून मुक्तता असा होतो ! अर्थात् लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पसार झाल्याबरोबर गांजलेला बहुजनसमाज व त्याचे कनिष्ठ मध्यमवर्गीय बुद्धिजीवि पुढारी यांच्यामध्ये उत्साहाचे चैतन्य खेळू लागले. म. गांधीनी आपले वर्चस्व काँग्रेसमध्ये पुनः प्रस्थापित करण्याकडे जनतेच्या या अलोट उत्साहाचा उपयोग करून घेतला. १९३० च्या मार्च महिन्यात दांडीच्या दौ-याचा उपक्रम करून म. गांधीनी साम्राज्यविरोधी असतोपास तोंड फोडले. तदनंतरच्या मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, प्रभातफेन्या, लाठीमार, सरकारचे वटहुकूम आणि दडपशाही इत्यादि हकिकती सर्वाच्या ताज्या आठवणीच्या आहेत. गुजराथ, कारवार जिल्हा, संयुक्तप्रांत इत्यादि भागातील शेतक-यांचा उठाव अवर्णनीय होता. त्यावेळी साठ सत्तर हजार लोक तुरुंगात गेले. बहुजनसमाजाच्या १९३० सालच्या उटावा मुळे ब्रिटिश साम्राज्यशाही हादरून गेली. ती कोलमडून पडते काय अशी भीतिही साम्राज्य मुत्सद्यांच्या हृदयास चिकटून गेली. या आणिबाणाच्या प्रसंगी साम्राज्यशाह ला हिंदी भांडवलदार वर्गाची बहुमोल मदत झाली. या वर्गलासुद्धा या प्रचंड उठावाची क्रांतीत परिणति होईल अशी धास्तीही पण होतीच. या चळवळीचा त्या वर्गाला लंडन येथील पहिल्या गोलमेज परिषदेच्यावेळी आपली बाजू जोमाने मांडण्याच्या कामी झाला होताच. आणि त्या वर्गाचा कार्यभागही उरकला होता. साम्राज्यशाही आणि हिंदी भांडवलशाही यामधील समेटाचा पाया याच परिषदेत घालण्यात आला, लगेच