पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ गांधीवाद हिंदुस्थानची राज्यघटना वनविणारा नेहरू रिपोटचा खर्डा त्या परिषदेने तयार केला. या खड्ला काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी पं. मोतीलालजींची सारी धडपड होती. कारण देशातली परिस्थिति इतकी भडकली होती की संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय कशानेही देशातील युवकांची भूक भागण्याजोगी नव्हती. पं. जवाहरलालजीनी यावेळी तरुणांचे . पुढारीपण पत्करले. पं. मोतीलाल नेहरू यानी आपल्या रिपोर्टस काँग्रेसचा पाठिंबा मिळावा ह्मणून म. गांधीकडे धाव घेतली. म. गांधीनाही आपले नेतृत्व पुनश्च प्रस्थापित करण्यास संधि हवी होती. पं. मोलीलालजींचे आमंत्रण येताच राजकारणातून अंग काढणारे गांधी काँग्रेसच्या राजकारणात एकदम उडी घेते झाले. १९२८ च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये म. गांधींच्या नेतृत्वाखाली नेहरू रिपोर्टाचा स्वीकार करण्यास सरकारला एक वर्षाचा अवधि देण्यात आला. स्वीकार न झाल्यास सत्याग्रह–संग्राम सुरू करण्याची धमकी देण्यात आली, लगेच १९२९ साली लाहोर काँग्रेसने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पसार करून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मार्गावरील बरीच मोठी मजल मारली होती. पण या ठरावाच्या जोडीला साम्राज्यविरोधी लढा देण्यासाठी आर्थिक कार्यक्रमावर बहुजनसमाजाची संघटना करण्याकरता काँग्रेसने काहीच उपाय योजना केलेली नव्हती. युद्धोत्तर ब्रिटीश साम्राज्यशाहीवर आर्थिक अरिष्टावर अरिष्टे येऊन ती विलक्षण आर्थिक भोव-यात सापडली होती. अशा परिस्थितीतच १९३०।३२ सालांचा बहुजनसमाजाचा क्रांतिकारक उठाव साम्राज्यशाहीस उखडून काढतो की काय अशी धास्ती साम्राज्यमुत्सद्याना वाटू लागली. देशातल्या उपरिनिर्दिष्ट क्रांतिकारक चळवळी हाणून पाडण्यासाठी त्यानी एका बाजूस गोलमेज परिषदेचा डाव टाकला, तर दुस-या बाजूस दडपशाहीचे सत्र एकसा १९२९च्या लाहोर काँग्रेसच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाने काँग्रेसचे