पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) आहे. गांधीवादाचा राजकीय कार्यक्रम हा राष्ट्रीय आकांक्षाना विरोधक आहे हे सिद्ध झाले झणजे गांधीवाद आणि राष्ट्रवाद हे एकच नाहीत हे स्पष्ट होईल. आपण आधी म. गांधींचा विधायक कार्यक्रम घेऊ आणि तो गांधीच्या ह्मणण्याप्रमाणे आपल्याला स्वातंत्र्याप्रत नेईल काय ते पाहूं. ह्मणजे विधायक कार्यक्रमाच्या आचरणाने हिंदी जनतेची प्रगति आणि उत्कर्ष यासाठी अवश्यक असे वर चित्रिलेले राष्ट्रीय स्वातंत्र्य हस्तगत होईल काय याचा विचार झाला पाहिजे. गांधींचा विधायक कार्यक्रम हा सर्वांना माहीत आहेच. त्याचा येथे विस्तार करण्याची जरूरी नाही. त्या कार्यक्रमाचा मध्य विंदु चरखा हा असून चरखा आणि अहिंसा यांचा अन्योन्य संबंध आहे असे गांधीजी ह्मणतात. इतकेच नव्हे, तर चरखा ही अहिंसेची मूर्तिमंत आविष्कृति किंबहुना प्रत्यक्ष आचार आहे असा म. गांधीचा विश्वास आहे. इतक्यावरच गांधीजी स्वस्थ बसत नाहीत, तर असा विश्वास प्रत्येक काँग्रेसवाद्याने बाळगला पाहिजे आणि दररोज नियमाने चरखा फिरवित बसले पाहिजे; असे सश्रद्ध वर्तन करणाराच खरा कॅग्रेिसवादी नि खरा राष्ट्रवादी असा गांधीजींचा अट्टाहास आहे. विधायक कार्यक्रमात चरख्याखालोखाल ग्रामोद्योगांच्या पुनरुज्जीवनास महत्त्वाचे स्थान आहे. या विधायक कार्यक्रमाच्या आचरणाने देशातील सर्व आर्थिक दुःखे नष्ट होऊन स्वातंत्र्याच्या लढ्याची गरज भासणार नाही, असा गांधीजींचा युक्तिवाद आहे. जणू काय, जादूची कांडी फिरवून स्वराज्य मिळविण्याचा हा मार्ग आहे ! सारांश, गांधीना हिंदुस्थान देशात परत मध्ययुगीन आर्थिक अवस्थेप्रत न्यावयाचे आहे. ह्मणजे प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण, स्वयंतृप्त, आपल्या सर्व गरजा आपणच भागविणारे असे स्वतंत्र आर्थिक घटक बनेल; परस्परस्पर्धा व युद्धाची कारणे नाहीशी होतील आणि हिंदुस्थानाने सा-या जगाला अहिंसेच्या प्रत्यक्ष आचाराचे नमुनेदार उदाहरण घालून दिलेसे होईल असे गांधीना वाटते. ही विचारसरणी