पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १०६ कमिशन, त्यावरील सार्वत्रिक बहिष्कार व ब्रिटिश साम्राज्यशाहीने एकाही हिंदी माणसास न नेमून केलेला अपमान, या सर्व गोष्टींचा परिणाम काँग्रेसमधील तरुणांच्या मनावर हळूहळू होत होता. देशात सर्वत्र माजलेल्या या असंतोषातून जनतेची प्रबळ संघटना घडवून आणण्यास क्रांतिवादी नेतृत्व हवे होते. या नेतृत्वाच्या अभावी भडकलेल्या तरुणांची मने पुनश्च दहशतवादाकडे झुकू लागली. या वस्तुस्थितीवर सायमन बहिष्कार-समयी लाला लजपतराय या लोकप्रिय पुढा-यावर झालेला लाठीमार आणि त्यात त्यांचा झालेला अंत या गोष्टीची ठिणगी पडली ! याचा परिणाम असा झाला की, देशभर दहशतवादास ऊत आला. भगतसिंगप्रभृतीनी सँडर्सवर गोळ्या झाडून त्यास ठार केले. जतींद्रदास तुरुंगातील छळास अन्नसत्याग्रहाचे उत्तर देऊन बळी गेला. ६ जतीन्द्र, भगतसिंग की जय' * गांधीवादाचा धिक्कार असो, इत्यादि तरुणांच्या आरोळ्यानी आकाश पाताळ एक करून सोडले ! । मिरत आणि दिल्ली येथील कम्युनिस्टांचे खटले, भगतसिंगप्रभृतींचे दहशतवादी लदे यानी चहूकडे जे एकच रान उठविले आणि तरुणांची मन जी भडकावून सोडली, त्यामुळे चरखा खादी, प्रार्थना, इंद्रिय दमनाचे प्रयोग इत्यादि आपल्या नित्याच्या आश्रम व्यवसायात गर्क झालेले म. गांधी खडबडून जागे झाले ! देशभर हिंसा थैमान घालून आपला अहिंसेसहित पराभव करते अशी मूर्तिमंत् भीती त्यांच्यासमोर दत्त ह्मणून उभी राहिली. लगेच काँग्रेसमधून संन्यास घेणारे म. गांधी पटकन् काँग्रेसच्या व्यासपीठावर आरूढ होऊन काँग्रेसचे नेतृत्व पत्करण्यास सज्ज झाले. मध्यंतरी भारतमंत्रि बर्कनहेड साहेब यानी सर्व पक्षास संमत असणारी घटना निर्माण करण्याबद्दल स्वराज्यपक्षास आव्हान दिले, ते स्वराज्यपक्षाचे धुरीण पं. मोतीलाल नेहरू यानी स्वीकारले. लगेच पं. मोतीलालजीनी सर्वपक्षीय परिषद् आमंत्रिली;वसाहतीच्या स्वराज्याच्या धर्तीवर