पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १०४ इतिहासाची छाननी पुढील क्रांतिवादाच्या प्रकरणी करू. तत्पूर्वी १९३० च्या राष्ट्रीय लढयाचे नेतृत्व अंगिकारून त्याचा बोजवारा म. गांधीनी कसा उडविला याचा थोडासा इतिहास देणे या स्थळी यथायोग्य होणारे आहे. असहकारितेची प्रचंड चळवळ व तिचेच पुच्छ म्हणजे स्वराज्य पक्षाची कौंसिलांतर्गत धडपड याची अशाप्रकारे वाताहत झाल्यावर योग्य नेतृत्वाच्या अभावी काँग्रेसमध्ये व देशात इतरत्र निराशेचे वातावरण पसरले. जनता दिङ्मूढ़ बनली. याप्रमाणे काँग्रेसचे नेतृत्व क्रांतिमारक होते, तथापि देशातील परिस्थिति दिवसेदिवस अधिकाधिक क्रांतिकारक बनत चालली होती. ब्रिटिश साम्राज्यज्ञाहीच्या पिळणकीने दिवसेदिवस हिंदी जनता त्रस्त झालेली होती. कामगार, शेतकरी, हरहुन्नर करून पोट भरणारे लोक, लहाने सहान दुकानदार, कारागीर व मध्यम वर्गीय सुशिक्षित तरुण इत्यादि सर्वाना आर्थिक अरिष्टांच्या झंझावाताने अगदी ‘त्राहि भगवान् करून सोडले होते. विशेषतः मोठमोठ्या कारखान्यात राबणाच्या कामगारांची स्थिति तर अत्यंत शोचनीय झालेली होती. त्याचे दृश्य फळ ह्मणजे १९२५ सालापासून ठिकठिकाणी संपाचा वणवा भडकू लागला हे ! १९२५ सालात १३३, १९२६ सालात १२७, १९२७ साली १२९ व १९२८ साली २०० असे निरनिराळ्या कारखान्यातून संप झाले. १९२८ सालाच्या मुंबईच्या गिरणी कामगारांचा संप अत्यंत चिरस्मरणीय होऊन गेला. यावेळी मुंबई गिरणी कामगारांची बलाढ्य संघटना बनून, या लढाऊ युनियनच्या निशाणाखाली सत्तर हजार कामकरी एकत्रिक झाले होते. या संपाच्या धामधुमीत, काही तरुण कम्युनिस्ट कानपूर खटल्याने तुरंगात डांबले गेले होते तरी, नव्या दमाचे तरुण पुढे सरसावले. यावेळी हिंदी कम्युनिस्ट चळवळींची सर्व सूत्रे कॉ. रॉय हे मास्कोतून हालवीत होते. रॉय यांची विचारसरणी व कार्यक्रम यानी तरुणांची मने भारून गेली होती. या सर्व गोष्टींचा काँग्रेसने चालविलेल्या स्वातंत्र्यलढ्यावर परिणाम होऊ