पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ गांधीवाद जुने ब्रिटिश साम्राज्यशाहीचे दोस्त आता निरुपयोगी बनले होते. नवे दोस्त हुडकून काढणे तिला आता अवश्य वाटू लागले. ते तिने लगेच शोधूनही पण काढले. ते म्हणजे हिंदी भांडवलशाहीचा वरचा थर बनलेले असे पतपेढीवाले ( 321nkers ) कारखानदार, बडे व्यापारी आणि त्यांचे राजनैतिक नेमस्त प्रतिनिधी हे होत. याप्रमाणे ब्रिटीश साम्राज्यशाही आणि हिंदी भांडवलशाही यांच्या एकजुटीची जनताविरोधी फळी या देशात उभारण्यात आली. हिंदुस्थानात ब्रिटीस सत्ता सुस्थिर करण्यास बहुमोल मदत केल्याबद्दल साम्राज्यशाही औद्योगिक मक्तेदारीत भागीदार बनण्याचे पारितोषक हिंदी भांडवलशाहीला मिळाले. अर्थात् साम्राज्यशाहीविरुद्ध चळवळ करण्यास तिला आता कोणतेच कारण उरले नाही. । | तात्पर्य, कोणत्याही लढ्याचे स्वरूप तो चालविणा-या वर्गाच्या आर्थिक गरजानी निश्चित केले जाते. परकीय सत्तेविरुद्ध हिंदी जनतेचा जो लदा आहे; त्याला कारण त्या जनतेच्या आर्थिक गरजा हेच होय. जोपर्यंत हिंदी भांडवलशाहीच्या वाढीला ब्रिटिश साम्राज्यशाहीचा प्रतिबंध होता, तो पर्यंत हिंदी राष्ट्रीय लढा हिंदी भांडवलशाहीने चालविला. पण ज्यावेळीं । ब्रिटिश भांडवलशाहीने हिंदी भांडवलशाहीला हिंदी जनतेच्या पिळणुकीत सहभागी करून घेतले, त्यावेळी तिच्या आर्थिक गरजांची थोड्याबहुत अशाने परिपूर्ति झाली व तिने राष्ट्रीय चळवळीची धुरा आपल्या मानेवरून ताडकन् फेकून दिली. अर्थात् यापुढे राष्ट्रीय लढा चालविण्याचे कार्य बहुजनसमाजावरच येऊन पडले. परंतु हिंदी बहुजनसमाज अत्यंत मागसलेला. त्याचे राजनैतिक शिक्षण ह्मणावे तर त्याच्या नावाने आवळ्याएवढे पूज ! त्यात कामगार वर्गाची अद्याप जनतेचे नेतृत्व पत्करण्याइतकी वाट झालेली नव्हती. रशियन क्रांति व तदुत्तर उलाढाली यांच्या वान्याची थोडीशी झुळूक हिंदुस्थानापर्यंत आल्याशिवाय राहिली नाही. त्यायोगे कामगारांच्या चळवळीना जोराची चालना मिळाली हे खरे. या चळवळींच्या