पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १०२ पक्षाविषयी सरकार निर्धास्त बनले, तर दुस-या बाजूस आर्थिक सवलती बहाल करून नेमस्त पक्ष, स्वतंत्र पक्ष, आणि प्रतिसहकार पक्ष ( स्वराज्य पक्षाचाच केळकर जयकरानी तोडून घेतलेला एकं भाग ) याना स्वराज्य पक्षापासून अलिप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकाकी पडलेल्या स्वराज्य पक्षाला सरकारशी * सन्माननीय समेट' करण्याशिवाय गत्यंतर नव्हते ! पण साम्राज्यशाहीस स्वराज्य पक्षाची बिनशर्त शरणागति हवी होती. सारांश, क्रांतीच्या भीतीने स्वराज्य पक्षाने बहुजनसमाजास दूर सारिले व वरिष्ठ हिंदी भांडवलशाहीस मिठी मारली. आर्थिक सवलती देऊन सरकारने त्या भांडवलशाहीस आपल्याकडे खेचून घेतले. स्वराज्य पक्षास त्रिशंकूप्रमाणे अधांतरी राहण्याचा प्रसंग येऊन त्याची वाताहत झाली. स्वराज्य पक्ष हा बहुजनसमाजाच्या असहकार चळवळीचाच अवशेष होता. त्याची अशी विल्हेवाट होऊन १९२०-२१ च्या बहुजनसमाजाच्या प्रचंड आंदोलनाचा अशाप्रकारे खेदजनक शेवट झाला. एकंदरीत या वस्तुस्थितीपासून ब्रिटिश साम्राज्यशाहीचे आसन अधिक दृढतर झाले. हिंदी वरिष्ठ भांडवलशाहीला टॅरिफच्या आर्थिक सवलती देऊ केल्यामुळे साम्राज्यशाहीच्या हिंदुस्थानातील राजसत्तेला कोणत्याही प्रकारचा बाध तर आलाच नाही; उलट लांचखाऊ हिंदी भांडवलशाहीचा तिला पूर्ण पाठिंबा मिळाला. शिवाय हिंदुस्थानास केवळ कृषिजीवि ठेवून आता ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भागण्याजोगे नव्हते. त्याच्या औद्योगिकरणास प्रारंभ करणे हेच ब्रिटनला याउपर किफायतशीर होते. हिंदुस्थानात ब्रिटिश भांडवल गुंतवून उद्योगधंदे उटविण्याने हिंदुस्थानातील अतिस्वस्त श्रम आणि कच्चा माल यापासून अलोट नफा प्राप्त करून घेण्याची यावेळी ब्रिटनला अतिगरज भासत होती. यायोगे हिंदी जनतेची विक्रय शक्ति वाढून ब्रिटिश मालाचा हिंदुस्थानात उठाव होण्याजोगा होता हे निराळेच ! जमिनदार, सरदार, संस्थानिक आदि करून