पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ गांधीवाद पक्षाचीही अशीच गत झाली, शेकडा९८ हिंदो जनतेला स्वराज्य प्राप्त करून देणार अशा दिमाखाने स्वराज्यपक्ष उदयास आला;पण एका वर्षाच्या आतच शेकडा दोन इतके असणा-या जमिनदार-भांडवलदारांचे त्या पक्षाने नेतृत्व पत्करले.कायदेमंडळात प्रतिकाराचा देखावा निर्माण करण्यासाठी त्या पक्षास नेमस्ताशी गट्टी करावी लागली;बहुजनसमाजाशी असलेल्या संबंधाचे मोल द्यावे लागले; भांडवलशाही हितसंबंधाखेरीज इतर सर्व गोष्टी आपल्या कार्यक्रमातून वगळाव्या लागल्या. याशिवाय दुसरा एक मार्ग स्वराज्य पक्षास मोकळा होता. तो ह्मणजे देशात बहुजनसमाजाच्या चळवळीचे रान उठवून तदनुरूप पार्लमेंटरी लढा चालविणे हा. पण हा मार्ग क्रांतिप्रत नेणारा होता. स्वराज्य पक्षाचा जन्म हाच आधी बहुजनसमाजाच्या चळवळीस बाजूस सारणाच्या क्रांतिविरोधी मनोवृत्तीतून झाला होता; क्रांति विरुद्ध सनदशीर सुधारणा हाच तर त्या पक्षाचा दंडक होता हे थोड्याच अवधीत स्पष्ट झाले. प्रारंभी प्रारंभी तर ब्रिटिश सरकारला स्वराज्य पक्षाचे भय वाटत होते. बहुजनसमाजाच्या चळवळीचा पाठिंबा घेऊन कौन्सिलांतर्गत लढा स्वराज्य पक्ष चालवील अशी सरकारला धास्ती होती. पण कायदेमंडळात स्वराज्य पक्षाने पदार्पण केल्याबरोबर त्याचे धोरण पालटले व तो पक्ष ह। पक्का सुधारणावादी झणजेच नेमस्त बनला. स्वराज्य पक्षाने अडवणुकीचा मार्ग ह्मणजे पुणेकरांच्या शब्दात कौन्सिलात घुसून घासण्याचा पंथ पत्करला. तरी तो निष्फळ ठरला. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या केसालाही धक्का पोचला नाही. ती आपल्या ताठरपणात स्वस्थ होती व चळवळीचा बीमोड करण्यास योग्य संधीची वाट पहात होती. चळवळ उखडून काढण्यास सरकारने आणखी एक उपाय योजिला. त्यामुळे स्वराज्य पक्षाची तर कंबरच खचली, तो म्हणजे समाजातील वरिष्ठ वर्गाला विशेषतः अत्युच्च हिंदी भांडवलशाहीला आर्थिक सवलतींची लांच देऊन आपलेसे करावयाचे. एका बाजूस बहुजनसमाज चळवळीपासून अलिप्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे स्वराज्य