पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १०० ताटातूट झाल्यामुळे त्या पक्षात आता असहकारितेमधला राजनैतिक जोम राहिलेला नव्हता. तथापि चळवळीतील असंतुष्ट शक्तीना कोठेतरी वाव हवा होता. तो स्वराज्य पक्षाच्या पार्लमेंटरी विरोधाच्या कार्यक्रमात थोडाबहुत मिळू लागला. स्वराज्य पक्षापासून देशाचा एवढाच फायदा झाला की काँग्रेस ही संस्था चरखालय किंवा प्रार्थनामठ बनणार होती, त्या अवस्थेपासून स्वराज्यपक्षाने नेमस्तांच्या सनदशीर राजकारणाची पुनश्च प्रतिष्ठापना केली. एका अर्थाने शत्रूवर बहिष्कार घालून त्याला परिस्थितीचा संपूर्ण स्वामी बनू देण्यापेक्षा त्याच्या कार्यक्षेत्रात घुसून लढा चालविण जास्त उत्साहजनक व परिणामकारक असते. पण पार्लमेंटरी लढ्यास बाहेरील जनतेच्या उठावाची जोड दिल्याशिवाय तो फलप्रद होऊ शकत नाही. विशेषतः हिंदुस्थानातल्या बेगडी पार्लमेंटातील झणजे कायदे कैंसिलातील असला एकांगी लढा तर अगदीच निष्फळ ठरतो. तथापि स्वराज्यपक्षाने आपले शक्तिसर्वस्व पार्लमेंटरी चळवळीवर वेचले. याचा परिणाम असा झाला की साम्राज्यशाही ही राष्ट्रवादी शक्तीपासून बिनशर्त शरणागतीची अपेक्षा करू लागली. राष्ट्रीय चळवळीतील कमकुवतपणा, समन्वयवृत्ति, प्रतिगामित्व इत्यादि दोषामुळे १९२१-२२ च्या प्रचंड चळवळीची वाताहत झाली आणि स्वराज्यपक्षाच्या भबकेबाज पार्लमेंटरी लीलाही निरर्थक ठरल्या. ही वस्तुस्थिति आकस्मिकपणे किंवा एकाद्या व्यक्तीच्या इच्छेनुरूप घडून आली असे ह्मणता येणार नाही. राष्ट्रीय चळवळीतील वर्गमूलक परस्पर विरोधी अशा हितसंबंधांचा तो परिणाम आहे. युवराजाच्या भेटीच्यावेळी कामगारांच्या संपांची जी उठावणी झाली किंवा बारडोली सत्याग्रहप्रसंगी शेतक-यांचा जो उठाव होणार होता, त्याना जो पायबंद घालण्यात आला त्यातच वर्गविरोधाचे स्वरूप अगदी स्पष्ट झाले. कामकन्यांच्या संपाविरुद्ध काँग्रेसने भांडवलदारांची बाजू घेतली आणि बारडोलीस रचनात्मक कार्यक्रमाचा ठराव पास करून शेतक-यांच्या उत्साहाचे मातेरे केले, स्वराज्य