पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ धावाद E -=-= - ह्मणजेच खंडबंदी अशी शेतक-यांची समजूत होऊन ते असहकारितेच्या चळवळीत सामील झाले. युद्धखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी वादविलेल्या करांचे ओझे आणि महागाई यामुळे गांजून असंतुष्ट पावलेला शेतकरी वर्ग बंडास प्रवृत्त झालेला होता. या शेतक-यांच्या बनलेल्या बंडखोर प्रवृतीस अनुसरून असहकारितेच्या चळवळीस वळण देणे अवश्य होते. परंतु कलकत्ता काँग्रेसने शेतकरी व कामकरी यांच्यापुढे कोणताच क्रार्यक्रम ठेवला नव्हता. १९२१ च्या डिसेंबर महिन्यात युवराजांची स्वारी इकडे आल्यावेळी कामगार वर्गाने हरताळात भाग घेऊन हिंदुस्थानातील बहुतेक सर्व शहरात तो यशस्वी करून दाखविला, हे कामकन्यांच्या असंतुष्ट मनाःप्रवृत्तीचे तत्कालीन प्रतीक होते. परंतु याचवेळी काँग्रेसचे सर्वाधिकारी म. गांधी हे अहिंसेच्या नावाखाली असहकारितेच्या चळवळीमागील शेतकरी कामकन्यांच्या प्रचंड शक्तीना हतबल करण्यास पुढे सरसावले. असहकारितेचा कार्यक्रम कसाही असो, स्वराज्याखाली किंवा “ गांधीराज्याखाली' आपली जमिनदार सावकाराच्या पिळणुकीपासून मुक्तता होणार अशी भावना शेतक-यानी करून घेतली. त्यामुळे शेतकरी वर्गात एक प्रकारचे चैतन्य खेळू लागले. पण हा शेतकरी कामकन्यांचा उत्साह म. गांधीच्या हळुवार अहिंसात्मक मनोरचनेस पधण्यासारखा नव्हता. लागलाच बारडोलीचा विधायक कार्यक्रम गांधीनी पुढे केला. त्या कार्यक्रमाच्या खडकावर जनतेच्या उत्साहाचे तारू आपटून त्याचा चुराडा उडाला. सारांश, सरकारच्या दडपशाहीने असहकारितेची चळवळ पराभूत केली नाही. तर अंतर्गत विरोधामुळे तिची अशी दुर्दशा झाली.कारण,काँग्रेसचे पुढारी पडले जमिनदार भांडवलदार वांचे प्रतिनिधी, त्याना क्रांतीकडे खेचणारा दलित जनतेचा उत्साह असह्य झाला हेच खरे. उध्वस्त झालेल्या असहकारितेच्या चळवळीच्या अवशेषातूनच पुढे दासबाबूच्या स्वराज्य पक्षाचा उदय झाला. बहुजनसमाजापासून त्याची