पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ हिंदी राष्ट्रवाद आणणारा होता, ह्मणून त्या उठावाची परिणति क्रांतीत होऊ नये याची खवरदारी त्या वर्गाच्या काँग्रेसमधील पुढा-यानी घेतली. खरे पाहिले असता सरकार हे १९२१ च्या चळवळीचा पराभव करूच शकले नाही. जनतेचा क्रांतिकारी उत्साह दडपशाहीस दाद देत नाहीसे पाहून सरकार अगदी गोगलगाय वनलेले होते. अशाप्रसंगी बारडोलीचा कार्यक्रम पुढे करून अहिंसेच्या नावाने माघार घेण्यास काहीच कारण नव्हते. अहमदाबाद काँग्रेसने सामुदायिक कायदेभंग पुकारला असता, तर जनतेने त्यात प्रचंड उत्साहाने भाग घेतला असता. सारांश, बहुजनसमाज क्रांतीच्या द्वारात येऊन टाकला असता पुढा-यानी त्यास दगा दिला ! नाही तर काँग्रेसमधील लोकशक्तींचा संघटित उठाव सरकारच्या लष्करी सामर्थ्यासही धाब्यावर बसवू शकताच अशी वेळ तेव्हा येऊन ठेपली होती. परंतु काँग्रेसचे पुढारी हे पहिल्यापासून जनतेच्या क्रांतिकारी चळवळीस बिचकत होते. ह्मणून शेतकरी, कामकरी आदिकरून बहुजनसमाजास चेतवून त्यास क्रांतिग्रवण करणारा कार्यक्रम काँग्रेपुढा-यानी जनतेपुढे मांडलाच नाही. असहकारितेचा कार्यक्रम अव्यवहार्य आणि अहिंसेने नियंत्रित असा होता. सर्वसामान्य राष्ट्रीय संपाची पार्श्वभूमि किंवा पूर्व-तयारी या दृष्टीने असहकारितेचा कार्यक्रम योग्य होता. परंतु चौरंगी वहिष्काराचा असहकारितेचा कार्यक्रम शेतकरी कामकरी वगैरे दलित जनतेच्या सार्वत्रिक संपापासून अलिप्त ठेवण्यात आलेला होता. शेतकरी आणि कामकरी या बहुजनसमाजाच्या दैनंदिन गाहाण्यावरती तसाच आकांक्षावर त्या कार्यक्रमाची उभारणी झालेली नव्हती, ह्मणून लढा सतत चालू ठेवण्याबद्दल आस्थाही पण शेतकरी-कामकन्यामध्ये उत्पन्न होणे शक्य नव्हते, कलकता काँग्रेसच्या जादा अधिवेशनात पास झालेल्या असहकारितेच्या ठरावात, देशभर बंडे करणा-या शेतक-याना अनुलक्षून असा कोणताच कार्यक्रम समाविष्ट करण्यात आलेला नव्हता. त्यात करवंदीचा उल्लेख होता. करवंदी