पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ गांधीवाद बहुमूल्य व्यवसायावर पाणी सोडले; शेकडो आमदारानी कौन्सिल बहिष्कार अमलात आणला. पण या जनतेच्या स्वार्थत्यागाचे फळ काय ? तर बारडोलीचा नेभळट कार्यक्रम की ज्या कार्यक्रमाने जनतेतील प्रतिकारी शक्ति व कांतिकारी मनोवृत्ति ही नामोहरम व्हावीत ! जी जनतेतील क्रांतिकारी शक्ति सरकारच्या दडपशाहीपुढे बेदाद ठरली, तिची बारडोलीच्या विधायक कार्यक्रमाच्या ठरावाने खच्ची केली. दासबाबूने झटल्याप्रमाणे जनतेने स्वार्थत्यागाची कमाल केली पण * you bungled and misrmanaged तुह्मी घोडचुका करून चळवळीची वाताहत केली.' हे वाक्य पर्यायाने गांधीनाच उद्देशन होते. अद्यापही त्या बारडोलीच्या नादान विधायक कार्यक्रमाचे काँग्रेसमध्ये स्तोम माजविले जाते. त्या कार्यक्रमाने केवळ राष्ट्रीय चळवळच हाणून पाडली असे नसून, बहुजनसमाजाने आपल्या चळवळीने निर्माण केलेल्या काँग्रेससारख्या क्रांतिकारी संस्थेच्या नरडींचा घोट घेतला. असो. १९२० ते १९२२ पर्यंतच्या अवधीत संबंध देशभर जो क्रांतिकारी । उठाव झाला, त्याचा बीमोड होण्यास सरकारची दडपशाही कारण झाली नाही तर गांधीप्रणीत राष्ट्रीय चळवळीचे तत्वज्ञान हेच त्या उठावाचा निःपात करण्यास कारणीभूत बनले होते. क्रांतीची धुरा ज्या मूठभर लोकांच्या हाती होती, तेच मुळी क्रांतिविरोधी होते. “ The movement was within an ace of success; " " mightiest empire was almost on its knees ' * चळवळ ही अगदी विजयाच्या टप्प्यांत आलेली होती, * प्रबलतम साम्राज्य गुडवेटेकीस आलेले होते.” असे उद्गार केवळ राष्ट्रीय पुढान्यानीच काढले अशातली गोष्ट नसून तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर जार्ज लॉईड यानीसुद्धा आपल्या कर्तृत्वाची शेखी मिरवीत असता याच मासेल्याचे शब्द उच्चारलेले होते. चळवळीची अशी जी वाताहत झाली, त्याबद्दल गांधी किंवा तत्सम एक दोन पुढा-याना दोष देण्यात अर्थ नाही. तर समाजातील उच्च वर्गांच्या हितसंबंधाना हा प्रचंड जानपद उठाव धोको १६ ।