पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७) झालेली होती. या वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण बहुजनसमाजास करून देणे जरूर होते, इतकेच नव्हे, तर तदनुरूप काँग्रेसचा कार्यक्रम १९२० सालानंतर आखणेही अवश्य होते. अशा त-हेचे राष्ट्रीय स्वातंत्र्याचे चित्र डोळ्यासमोर आणले झणजे हे स्वातंत्र्य ध्येय गाठण्याच्या कामी गांधीवाद कुचकामाचा ठरतो हे स्पष्ट होते. हे राष्ट्रवादाचे चित्र ह्मणजे वांछित विचारसरणीचे फळ आहे अशातली गोष्ट नाही. हिंदुस्थानातील प्राप्त परिस्थिति आणि सामाजिक शक्ती यांच्या पार्श्वभूमीवर चितारलेले ते वास्तव चित्र आहे. परकीय सत्तेने दोनशे वर्षे थोपवून धरलेल्या हिंदी समाजाच्या विकासक्रमाच्या कोंडलेल्या प्रेरणेचे ते मूर्त स्वरूप आहे. तेव्हा प्रथम त्या प्रेरणेचा कोंडमारा करणा-या परकीय सत्तेचा बांध फोडला पाहिजे, ह्मणजे त्या प्रेरणेतून असा काही जोराचा प्रवाह निघेल की, जो परकीय सत्तेवर आधारलेले राष्ट्रीय विकासाच्या मार्गातील सर्व अडथळे उडवून येईल. हा जो हिंदी राष्ट्रवादाचा कार्यक्रम वर विशद करण्यात आला त्याची ऐतिहासिक अवश्यकता आहे. अंकित देशाव्यतिरिक्त अन्य देशात जे राष्ट्रवादाचे स्वरूप आज आढळून येते, ते झोटिंग अशा दरोडेखोरी आक्रमक वृत्तीचे प्रदर्शन आहे.अशा राष्ट्रवादाला फॅसिझम् ह्मणजे झोटिंगवाद हे नाव आहे. हिंदी राष्ट्रवाद असा नाही आहे. त्याने परकीय देश पादाक्रांत करण्याची अथवा त्यातून लूट मिळविण्याची हाव बाळगलेली नाही. हिंदी राष्ट्रवाद हा प्रगतीच्या प्रेरणेने स्फूर्त झालेला आहे. विलंबित क्रांतीचा अमल तात्काळ सुरू व्हावा असे त्या राष्ट्रवादाला वाटते. । यापुढे गांधीवाद ह्मणजेच राष्ट्रवाद असा जो समज या देशात प्रचलित आहे तो कसा संपूर्ण चुकीचा आहे हे पाहू. गांधीवाद ह्मणजे अध्यात्म विचार, नैतिक कल्पना व धार्मिक मते यांची एक खिचडी आहे. गांधीवादात परस्पर विरोधी अशा अनेक अवास्तव कल्पनांचा अंतर्भाव