पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ९६ अशाप्रकारे गांधीवाद हा प्रगतिप्रतिबंधक असल्यामुळे हिंदी राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाची बैठक बनविणे त्याला अशक्य झालेले आहे. राष्ट्रवादाचे क्रांतिकारी स्वरूप त्यास विरोधक ठरते! इतके असूनही गेली बावीस वर्षे गांधीवादाने किंबहुना गांधी या व्यक्तीने हिंदी राष्ट्रीय चळवळीत इतके थैमान घातले आहे की त्याला इतिहासात दुसरी तोड नाही. ज्या काळांत शेतकरी, कामकरी आदिकरून बहुजनसमाज काँग्रेसच्या झेंड्याभोवती गोळा होत होता, त्याचकाळात अत्यंत प्रतिगामी आणि प्रतिक्रांतिकारक अशा शक्तींच्या दडपणाखाली काँग्रेसची व तिच्याद्वारे चाललेल्या प्रचंड राष्ट्रीय चळवळीची वाताहत व्हावी हे देशाचे दुर्दैव नव्हे तर काय ? १९१९ सालापासून काँग्रेस ही संस्था बहुजनसमाजाची बनत चालली. त्यावेळेपासून काँग्रेसपुढे बहुजनसमाजाचा कार्यक्रम ठेवण्यास हवा होता. म. गांधींचा असहकारतेचा कार्यक्रम हा भावनात्मक आणि अव्यवहार्य असा होता. त्या कार्यक्रमामुळे देशात प्रचंड खळबळ उडाली तरी, बहुजनसमाजाची संघटना झाली नाही. विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजे सोडणे,वकीलानी कोर्टाची पायरी न चढणे, आणि आमदारानी कायदे मंडळावर बहिष्कार घालणे या बहिष्कारत्रयीचा आणि बहुजनसमाजाचा काही एक संबंध नव्हता. जनता जागृत झाली पण फलनिष्पत्ति काही झाली नाही. उन्हाळ्यातील ढगाप्रमाणे चळवळीने गडगडाट केला परंतु पाऊस पडला नाही. यावेळी राष्ट्रीय संप पुकारला जाणार; करबंदीचा कार्यक्रम अमलात आणला जाणार; सामुदायिक कायदेभंगास सुरवात होणार; सरकारला पेचात पकडले जाणार; एका वर्षात स्वराज्य मिळणार; इत्यादि भुलथापा जनतेला दिल्या गेल्या. पण सामुदायिक सत्याग्रहाची तशीच करवंदी वेळ आली असता चौरी चौराच्या दंग्याचे निमित्य करून राष्ट्रीय चळवळ बंद पाडण्यात आली, जनतेच्या उत्साहावर विरजण घालण्यात आले. आणि देशभर निराशेचा अंधार पसरला.असंख्य विद्यार्थ्यांनी शाळा-कॉलेजे सोडली,हजारो वकीलानी आपली