पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ गांधीवाद त्याना पिळून काढणा-या आमत जनतचा कायमच काढणाच्या श्रीमंत जनतेची कायमची चंगळ चालणारी आहे. भांडवलशाही समाजरचना कुसलेली आहे; पण ती अपरिहार्य आहे. तथापि ती नित्य शाश्वत आहे असे समजण्याचे कारण नाही. समाजविकासाच्या अनुक्रमात योग्यवेळी तीही पण नाश पावणार आहे. ज्याप्रमाणे तत्पूर्वीच्या समाज रचनेचे स्थान तिने पटकाविले, त्याचप्रमाणे नव्या समाजरचनस ती आपले स्थानही मोकळे करून देणार आहे. भावनात्मक भूतदयावाद्याना भांडवलशाही समाजव्यवस्था निर्दयता आणि अन्याय यानी पूर्ण भरलेली आहे असे आढळून येते ह्मणून ती कोलमडून पडेल अशातला भाग नाही. अंतर्गत विरोधाच्या दडपणाखालीच तिचा चकाचूर होणार आहे. भांडवलशाही समाजरचना आह्मास हवी असो वा नसो, त्या अवस्थेतून जाणे मानव जातीस अवश्यक आहे. मानव जातीच्या नैतिक आणि भौतिक बंधनांचा निरास होऊन मानवाना संस्कृतीचा उच्च दर्जा गांठण्यासाठी प्रयत्न करण्यास अनुकूल परिस्थिति भांडवलशाही समाजसंस्कृति प्राप्त करून देते, तेव्हा राष्ट्रीय स्वातंत्र्य, प्राप्त झाल्यावर हिंदुस्थान मागे वळणार नाही, तर जोमाने पुढे पाऊल टाकण्यास सज्ज होईल. भांडवलशाही समाजव्यवस्थेत काही अभिजात दोष आहेत हे खरे आहे. परंतु, पितृप्रधान किंवा सरंजामी समाजव्यवस्थेतील गांधीप्रिय संस्कृतीपेक्षा भांडवलशाही संस्कृति निःसंशय सुधारलेली असते. म. गांधी व त्यांच्या विचारसरणीचे तत्त्वज्ञानी यांच्या इच्छाप्रयत्नास न जुमानता हिंदी समाज हा भांडवलशाही संस्कृतीकडे वेगाने दौडत आहे. त्यास मागे खेचू पाहणे ह्मणजे नदीस आपल्या उगमाकडे परतविण्याचा वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे. याप्रमाणे गांधीवाद हा हिंदी राष्ट्रवादास मारक आहे.