पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

71 हिंदी राष्ट्रवाद ९४ त्या लढ्याची गांधीवादापासून मुक्तता करणे अत्यवश्य आहे हे निःसंदिग्ध होत नाही काय ? | अर्वाचीन भांडवलशाही समाजरचनेवर गांधीजी जी टीका करतात ती रास्त आहे. पण तिजवर जो उपाय ते सुचवितात तो केवळ चुकीचाच आहे असे नसून तो अशक्य कोटीतलाही पण आहे. हल्लीच्या समाजव्यवस्थेवर टीका करणारा भावनात्मक भूतदयावादी किंवा धर्मवेडा असला पाहिजे अशातली गोष्ट नाही. भौतिक आणि सामाजिक शास्त्रांचे ज्याना ह्मणून ज्ञान आहे, त्याना गांधी आणि त्यांचे आंतराष्ट्रीय बांधव यांच्या भूतदयेत किंवा धर्मशीलतेत घातुक प्रतिगामी शक्ती चांगल्या खोलवर वावरत असलेल्या आढळून येतात ! आता गांधीवादातील काही तत्त्वे घेऊ आणि त्यांचे खरेखुरे सामाजिक स्वरूप उघडकीस आणू. गांधीजी ह्मणतात:-* आह्मी इंद्रियांचे चोचले पुरवू लागलो, ह्मणजे ती बिन्लगामी घोड्याप्रमाणे सैरावैरा धावू लागतात. ह्मणून आमच्या पूर्वजानी विषयोपभोगास मर्यादा घातली. बहुतांशी सुख ही एक मानसिक अवस्था आहे हे त्याना आढळून आले. मनुष्य श्रीमंत असला ह्मणजे सुखी असतोच असे नाही; किंवा दरिद्र असला झणजे तो बहुशा दुःखी होतोच असे ह्मणता येणार नाही. कोट्यावधी लोक हे नेहमी दरिद्रीच असणार, हे सर्व लक्षात घेऊनच आमच्या पूर्वजानी आह्मास चैनीपासून आणि विषयोगापासून परावृत्त केले. हे दारिद्याचे दांभिक तत्त्वज्ञान सर्वांच्या परिचयाचे आहे. ज्यांची भविष्ये इतिहासाने खोटी ठरवलेली आहेत, अशा अनेक भविष्यवाद्यांनी हे तत्वज्ञान पढविलेले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांचा भूतदयावाद हाही साशंक ठरलेला आहे ! मानवाने मानवाच्या चालविलेल्या पिळणुकीवर आधारलेल्या विविध युगातील विविध त-हेच्या आर्थिक हितसंबंधांच्या संरक्षणाची हमी घेणे, हे एकच कार्य या दांभिक तत्त्वज्ञानाने साधलेले आहे. दरिद्री जनतेने दारिद्यात कायमचे समाधान मानण्यानेच