पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ गांधीवाद बंडाचा बाध न येता मूठभर लोकांना खुशाल चैनीत लोळता यावे ह्मणून बहुसंख्य जनतेस आनंदमय अज्ञानात डांबले जाते, बहुतेक सर्व जनतेच्या रानटीपणावर ज्या युगातली संस्कृति आधारली जाते, ज्या युगातला साधेपणा ह्मणजे मागासलेपणाचे चिन्ह होय, अशा प्राचीन सुवर्ण युगाची पुनरावृत्ति व्हावी ह्मणून गांधीवाद हा खंगत असतो. ” १९०८ साली म. गांधी दक्षिण आफ्रिकेत असता, त्यानी अप्रतिकारात्मक आणि आत्मबलात्मक अशा आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी आपल्या * इंडियन होम रूल' या ग्रंथात केलेली आहे. त्या ग्रंथात त्यानी प्राश्चात्य संस्कृतीचा पुरेपूर धिक्कार केलेला असून हिंदी मध्ययुगीन ग्राम संस्कृतीचा जोमाने पुरस्कार केलेला आहे. गांधीजी ह्मणतातः-- “I feel that if India would discard modern civilisgation, she can only gain by doing so. If India adopted the dootrine of love as an active Part of her religion and introduced it in her politics, Swaraj would descend upon India froin heaven” या गांधीजींच्या ह्मणण्याचा आशय हा की, पाश्चात्य अर्वाचीन संस्कृतीची उभारणी हिंसेवर झालेली असल्यामुळे ती हिंदुस्थानास त्याज्य होय ! प्रीतीवर हाणजेच अहिंसेवर आधारलेली जी हिंदी संस्कृती तिचाच अंमल हिंदुस्थानात व्हावा. ह्मणजे स्वराज्य स्वर्गातून हिंदुस्थानावर एखाद्या माळेप्रमाणे गळून पडेल. यावरून गांधीजींचा रोष हा ब्रिटिश सरकारवर नसून त्या सरकारच्याद्वारे हिंदुस्थानात अवतीर्ण झालेल्या पाश्चात्य संस्कृतीवर आहे हे स्पष्ट होते. अर्थात् पाश्चात्य संस्कृति हिंदुस्थानात आणण्याचा किंवा तिचा प्रसार करण्याचा खटाटोप जर हिंदी सरकार करील तर तेही सरकार गांधीजीना ब्रिटिश सरकाराइतकेच अमान्य होईल. भांडवलशाही संस्कृतीचा मनापासून तिटकारा मानणाच्या व्यक्तीच्या हाती भांडवलशाही समाजरचना अस्तित्वात आणू पाहणा-या चळवळाची सूत्रे असावीत यापेक्षा असंबद्ध वस्तुस्थिति ती कोणती!. यावरून हिंदी स्वातंत्र्याचा लढा पुढे रेटण्यासाठी