पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ हिंदी राष्ट्रवाद नाही, हे जरी खरे असले तरी जनतेची दिशाभूल होऊन ती दिङ्मूढ़ होते; तिची विचार शक्ति नष्ट होते व पुढील प्रगतीचा किंबहुना राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मार्ग कसा चोखाळावा हे तिला समजेनासे होते. तेव्हा जनतेची खच्ची करून तिच्या क्रांतिवेगाला सतत बावीस वर्षे थोपवून धरणारा गांधीवाद ह्मणजे काय चीज आहे याचे विश्लेषणात्मक विवेचन करणे क्रमप्राप्तच आहे. वर प्रकरणारंभी कॉ. भानवेन्द्रनाथ रॉय यांच्या १९२२ साली लिहिलेल्या * संधिकालीन हिंदुस्थान' या ग्रंथातील जो उतारा दिलेला आहे, त्यास गांधीवादाचा काढलेला अर्क ह्मणता येईल. त्याचा अनुवादः-* विक्षिप्तपणा आणि कडवेपणा यात गांधीपंथ हा अद्वितीय असला तरी, तो काही गांधीनी नव्याने या देशात आणला असे ह्मणता येणार नाही. बंडखोरी जोम आणि राजनैतिक धूर्तपणा हे टिळकांचे विशेष गुण न विसरता, धार्मिक श्रद्धा आणि अध्यात्मिक पूर्वग्रह याबाबतीत टिळक आणि गांधी समसमान होते असे ह्मणण्यास प्रत्यवाय कोणता ? आधुनिक विचारांची बहुविधता आणि मतचांचल्य हे पालबाबूचे विशेष, विशेष ध्यानात धरूनही, मानवी भौतिक सुखवर्धन करणा-या गोष्टींचा विशेष करणाच्या बाबतीत ते गांधींची साथ धरतील असे विधान केल्यास अवास्तव ठरणार नाही. अरविंद बाबू हे पूर्वग्रहदूषित आध्यात्मिक विचारात विलीन होण्यापेक्षाही जास्त एकनादी बनले असते तर, क्रांतीच्या प्रचंड ओघाला थोपवून धरणाच्या गांधी तत्त्वज्ञानाचाच त्यानी पाठपुरावा केला असता ! मानव समाजाच्या प्रगतिसाठी धडपडणान्या शक्तींच्या झगड्यात बेभान गोंधळून गेलेला कनिष्ठ मध्यम वर्गीय भूतदयावाद ह्मणजेच गांधीवाद. या भूतदयावादाचे नकाश्रू वरपांगी भांडवलीशाही समाज रचनेतील बहुसंख्यांच्या निःसंदिग्ध हाल अपेष्ठासाठी गाळिले जातात, पण त्या अश्रस जुन्या जीर्ण झालेल्या समाज-पद्धतीचा सावकाश चालू असलेला अंत हाच वास्तविक कारणीभूत असतो! ज्या युगात असंतुष्ट जनतेच्या