पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ गाँधीवाद अज्ञ जनता सनदशीर लोकशाहीपेक्षा धर्मप्रवण राष्ट्रवादाला लगेच पाठिंबा देते, परंतु त्या राष्ट्रवादाच्या प्रतिगामी प्रवृत्तीमुळेच परकीय सत्तेचा पाया हादरून सोडून जनतेला पुढील विकासक्रमाच्या मार्गास लावण्याजोगे प्रभावी असे क्रांतिकारी सामर्थ्य त्या राष्ट्रवादात नसते. तथापि वर स्पष्ट केल्याप्रमाणे बहुजनसमाजाच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व पत्करण्यास पुरोगामी राष्ट्रवादी कचरल्यामुळे साहजिकच क्रांतिवादी नेतृत्वाच्या अभावी, धर्म आणि संस्कृति यांच्या नावाखाली परकीय सत्तेविरुद्ध जनतेस चेतवून तिचे नेतृत्व काबीज करण्यास प्रतिगामी राष्ट्रवाद्याना आयतेच फावले! यामुळे बहुजनसमाजाच्या चळवळीत अंतर्विरोध निर्माण होऊन स्वातंत्र्य लढ्याची हानिच झाली. साम्राज्यशाही पिळणुकीमुळे बहुजनसमाजातील सहनशीलता व धार्मिक धिमेपणा ही पार उडून जात होती; उलट प्रतिगामी गांधीवादी नेतृत्व हे अहिंसेची अफू चारून काँग्रेसच्याद्वारे समाजास आर्थिक दुःखे सोसण्यास प्रोत्साहन देत होते. सारांश, गांधीवादी नेतृत्व हे बहुजन समाजातील क्रांतिकारक शक्ती दडपून टाकण्यास पुढे सरसावले. ह्मणजे एका बाजूने आर्थिक हलाखीमुळे जनतेची दैववाद, ईश्वरवाद इत्यादि दुबळ्या तत्त्वज्ञानावरील श्रद्धा उडून जात होती, इतकेच नव्हे तर तिच्यात क्रांतिप्रवण शक्ती संचार करीत होत्या, तर दुस-या बाजूने गांधीवाद हा जनतेस सत्य अहिंसेची कास धरण्यास व ईश्वरावर भार टाकून अंधश्रद्धेने स्वस्थ बसण्यास शिकवीत होता. तुफान वेगाने प्रगतिपथ आक्रमू पाहणा-या क्रांतिरूप वाहनास गांधीवादाचा ब्रेक मागे खेचीत होता! तेव्हा अशा परिस्थितीखाली हिंदी राष्ट्रीय चळवळ गेल्या दोन दशकात काहीच प्रगति करू शकली नाही, एवढेच नव्हे तर, अखिल हिंदी जनतेला वरपांगी क्रांतीची भाषा बोलून, खरोखर अंधारात चाचपडत ठेवण्यास ती कारणीभूत झाली यात नवल कसचे ? गांधीवादाचे वर्चस्व जनतेला मागसलेल्या मनुकालीन प्राथमिक युगाकडे नेऊ शकत