पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ९० ठरत असल्यामुळे तिचे राष्ट्रीय तत्वज्ञान ( अर्थात् राष्ट्रवाद ) कितीही पुरोगामी असले तरी, तिला आपले धोरण ब्रिटिश साम्राज्यशाहीशी जुळणारे ह्मणजे समन्वयात्मक ( Compromising ) ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अनिर्वाह पक्ष ह्मणून भांडवलशाही संस्कृतीस हिंदुस्थानात थारा देऊ इच्छिणाच्या ब्रिटिश सत्तेपेक्षा, हिंदी सामाजिक आणि राजकीय पुनरुज्जीवन करू पाहणा-या प्रतिगामी राष्ट्रवादाशीच पुरोगामी राष्ट्रवादाचे वैर जास्त असते. . याखेरीज प्रतिगामी राष्ट्रवादाच्या वर्चस्वाखाली असो, किंवा वर्ग युद्धाच्या स्वयंस्फूर्त प्रेरणेमुळे असो, बहुजनसमाजाचा उठाव हा, आपल्या आर्थिक हितसंबंधांची व सामाजिक स्नेहसंबंधांची संपूर्णपणे जाणीव असणाच्या पुरोगामी राष्ट्रवाद्यांची छाति दडपून टाकतो. प्रतिगामी राष्ट्रवादाच्या नेतृत्वाखालचा उठाव हा सामाजिक आणि राजकीय पुनरुजीवनाच्या कार्यक्रमाने प्रेरित असल्यामुळे पुरोगामी राष्ट्रवाद्याच्या राष्ट्रीय औद्योगिकरणाच्या कार्यक्रमाला पायबंद घालतो. तर बर्गयुद्धमूलक क्रांतिवादाच्या नेतृत्वाखालील बहुजनसमाजाचा उठाव भांडवलशाही अर्थकारणाला खीळ घालतो. सारांश, हे दोन्ही त-हेचे उठाव हे ब्रिटिश सत्तेपेक्षा हिंदी पुरोगामी भांडवलशाहीला भीतिजनक होत ! ह्मणून पुरोगामी राष्ट्रवादी हे क्रांतीला चालना देणारे भांडवलशाही अर्थकारण देशात प्रचलित करण्यास धडपडत असले तरी, बहुजनसमाजाच्या चळवळीचे रान उठवून तिचे नेतृत्व पत्करण्यास ते राजी नसतात. इतकेच नव्हे, तर भांडवलशाहीचा शांतिपूर्ण उत्कर्ष करणा-या भांडवलशाही संस्थावर अशा चळवळी घाव घालीत असल्यामुळे, त्या चळवळी उपस्थित झाल्यावेळी साम्राज्यशाहीच्या संरक्षक छत्राखाली दडून बसण्याशिवाय त्याना गत्यंतर नसते. प्रतिगामी राष्ट्रवादाची गोष्ट तशी नाही. भूतकालाचा व परंपरेचा उदोउदो करणारा प्रतिगामी राष्ट्रवाद जनतेच्या लक्षात लौकर भरतो. त्याबद्दल अज्ञ जनतेला जिव्हाळा वाटत असल्यामुळे तो तिला चेतवू शकतो.