पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ गांधीवाद राजकारणात पुरोगामी पण समाजकारणात क्रांतिकारी आणि सतत तडजोडीच्या मार्गाने हिंदी राष्ट्राचा विकास घडवून आणू पाहणारी. दुसरी प्रवृत्ति परकीय सत्तेशी दिसायला सतत फटकून वागणारी पण सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत प्रतिगामी अशी. पुरोगामी राष्ट्रवादाचे राजनैतिक तत्त्वज्ञान सुधारणावादी असले तरी पुरोगामी भांडवलशाही समाजरचना अस्तित्वात आणण्याबद्दल त्याचा खटाटोप असल्याकारणाने क्रांतिकारी परिस्थिति निर्माण करण्याच्या कामी तो सहाय्यकारी बनतो.परंतु क्रांतिवादी चळवळीचे नेतृत्व पत्करून क्रांति घडवून आणण्याचे सामर्थ्य त्या वादात आता उरलेले नव्हते. कारण निर्भेळ भांडवलशाही क्रांति घडून येण्याजोगी परिस्थिति आजच्या हिंदुस्थानात राहिलेली नव्हती. ह्मणजे हिंदी राष्ट्रीय चळवळी ही, उदयोन्मुख व्यापारी आणि व्यावसायिक मध्यम वर्ग व मरणोन्मुख सरंजामशाही या दोहोतील लढ्याचे फ्रेंच क्रांतिकालीन स्वरूप धारण करणे आता शक्य नव्हते. किंबहुना हिंदी भांडवलशाही ही कोणत्याच । वर्गयुद्धात केव्हाही गुंतलेली नव्हती. १९१८ पर्यंत तिने काँग्रेसच्या द्वारे चालविलेली राष्ट्रीय चळवळ ह्मणजे कमकुवत व कुचंत्रित अशी हिंदी भांडवलशाही आणि अत्यंत प्रबळ व सर्वसत्ताधारी अशा ब्रिटिश साम्राज्यशाही या एकच वर्गाच्या दोन शाखा मधली निवळ चुरस होय ! हिंदी सरंजामशाहीच्या गुलामगिरीतून उत्पादक वर्गाची सुटका करण्याचे ऐतिहासिक कार्य हिंदी मध्यम वर्गाच्या हातून ब्रिटिश साम्राज्यशाहीने दीडशे वर्षापूर्वीच कसे हिरावून घेतले होते हे या ग्रंथारंभी विशद केले आहे. तेव्हा २० व्या शतकातला हिंदी भांडवलशाहीचा साम्राज्यविरोधी सामना अटितटचा होणे केव्हाही शक्य नव्हते. कारण हिंदी भांडवलशाहीचा विकास व उत्कर्ष ही साम्राज्य-विनाशवरच अवलंबून नव्हती. किंबहुना साम्राज्यशाहीची मर्जी संभाळून आपला कार्यभाग साधून घेणे तिला अशक्य नव्हते. हिंदी भांडवलशाही ब्रिटिश भांडवलशाहीपुढे अत्यंत दुर्बल १५