पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ८८ नेमस्तापेक्षा राष्ट्रीय चळवळीत बहुजनसमाजास खेचण्याकामी अधिक यशस्वी ठरले. जहालाना यश प्राप्त होण्यास कारण आर्थिक पिळणुकीमुळे बहुजनसमाजात जो असंतोष माजला होता त्यातूनच जहालानी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मागणीचा लौकिक देखावा निर्माण केला. जहालांच्या सनातनी प्रवृत्ती आणि धार्मिक लहरी कशाही असोत, प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात ते नेमस्ताशी सहमत होऊ शकतात हे वर दिदर्शित केलेले आहे.बहुजनसमाजाच्या स्वयंस्फूर्त उठावामध्ये हिंदी भांडवलशाहीला विजय संपादन करून देण्यास उपयोगी पडणारी शक्ति आहे जहालानी ताडले.पण बहुजनसमाजाच्या अंत:प्रेरणा आणि सामाजिक आकांक्षा याना अनुरूप असे त्या शक्तीचे नेतृत्व पत्करून बहुजनसमाजाच्या चळवळीतील सामर्थ्याचा विकास जहालानी घडवून आणला नाही. उलट बहुजनसमाजाच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेऊन राष्ट्रीय चळवळ बळकट करण्याच्या मोहास ते बळी पडले. जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचा उत्कृष्ट मार्ग ह्मणजे राष्ट्रवादाचा धर्म बनविणे हा होय. राजकारणात धर्माचे प्रस्थ माजवू देणा-या जहालांच्या डावपेचांचा परिणाम झणजेच काँग्रेसमध्ये गांधीवादाचे वर्चस्व होय. जहालांच्या अध्यात्मप्रवण शिकवणुकीनेच गांधीवादाची पार्श्वभूमि तयार केली व म. गांधी हे हिंदी राजनैतिक क्षितिजाबर चमकू लागले. त्यांच्यापुढे जहालमवाळादि इतर सर्व राजकीय आणि सामाजिक पुढारी लोपले. ह्मणून गांधीवादातच इतर सर्व राजनैतिक आणि सामाजिक प्रवृतींचा लोप झाला.पुरोगामी राष्ट्रवादातील क्रांतिकारी सामाजिक शक्तीचा नायनाट करण्याच्या हेतूनेच गांधीवाद अवतीर्ण झाला. गांधीवाद ह्मणजे हिंदुस्थाच्या इतिहासातील यच्चावत् प्रतिगामी शक्तींचा अतितीव्र आणि अत्यंत बेफाम असा आविष्कार होय. अर्वाचीन हिंदुस्थानात राष्ट्रवादाचा उगम झाल्यापासूनच त्यात परस्परविरोधी अशा दोन प्रवृत्ती दृष्टिगोचर होतात. एक प्रवृत्ति