पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८७ गांधीवाद णाच्या क्षेत्रात राष्ट्रीय भांडवलशाही हितसंबंधाच्या वरील मागण्यानाच अग्रस्थान देत होती. हे, जहालाग्रणी लाल, बाल आणि पाल यांच्या १९१६ नंतरच्या आचार उच्चारावरून स्पष्ट होते. सारांश, १९१८ पर्यंतचा हिंदी स्वातंत्र्याचा लढा हा, ब्रिटिश भांडवलदारांच्या अर्थात् साम्राज्यशाहीच्या आर्थिक आणि राजनैतिक मक्तेदारीविरुद्ध हिंदी मध्यम वर्गाचा लढा होय. या लढ्यात यश संपादन करण्यासाठी किंबहुना काही सवलती प्राप्त करून घेण्यासाठीसुद्धा बहुजनसमाजाच्या पाठिंब्याची त्या वर्गाला गरज होती. कारण,संख्येने तसाच आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या तो वर्ग दुबळा होता. तेव्हां बहुजनसमाजास आपल्या स्वत:च्या लढ्यात,राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली, गुंतविणे मध्यम वर्गास भाग पडले. या लढ्यात हिंदी भांडवलशाहीस विजय मिळाला तरी, बहुजनसमाजास झीज सोसावी लागूनही ह्मणण्यासारखा भौतिक फायदा झाला नाही ! तथापि हिंदी भांडवलाच्या पेरणीमुळे होणा-या हिंदी औद्योगिक विकासाने श्रमजीवि जनतेच्या जीवनात क्रांति घडून आली, आणि ती जनता राजकीय चळवळीत खेचली गेली. हिंदी भांडवलदार वर्गाच्या विकासामळे भांडवलशाही आणि श्रमजीवि वर्ग यामधला वर्गविरोध सखोल तसाच स्पष्ट झाला. याचा परिणाम असा झाला की हिंदी स्वातंत्र्याचा लढा हा वरपांगी दिसायला बहुजनसमाजाच्या पाठिंब्याने चालविलेला असा राजकीय स्वरूपाचा दिसत असला तरी त्याचे अंतरंग वर्गयुद्धात्मक बनत चालले होते. ह्मणजे पिळणूक करणा-या विरुद्ध पिळले जाणान्यांचा उठाव हे अंतःस्वरूप त्या लढ्याला प्राप्त होत होते. एका बाजूला ब्रिटिश साम्राज्यशाही आणि तिचे अंकित हिंदी भांडवलदार, जमिनदार, संस्थानिक इत्यादि तर दुस-या बाजूला हिंदी दलित वर्ग झणजे शेतकरी, कामकरी आणि कनिष्ठ मध्यम वर्ग असे या लढ्यात दोन पक्ष प्रादुर्भूत होऊ लागले. । | टिळक युगातले जहाल अर्थात् गांधी युगातले असहकारवादी हे