पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

11 (६) राष्ट्रवादी चळवळीने बहुजनसमाजाचा केवळ विश्वासच नव्हे तर सक्रिय | पाठींबाही मिळविलेला आहे. । १९१९-२० पर्यंतच्या हिंदी राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप क्रांतिकारी नव्हते. त्या चळवळीवर राजकारणाचा नुसता मुलामा देण्यात आला होता. तिचा दृष्टिकोण राज्यकारभारात काही मामुली सुधारणा प्राप्त करून घेण्यापलीकडे नव्हता. तिचा फैलाव केवळ उच्चवर्गाचा काही सुशिक्षित जनतेपुरता होता. त्या चळवळीचा बहुजनसमाजावर काही एक परिणाम झालेला नव्हता. पण १९१९ पासून त्या चळवळीला अजिबात् निराळे स्वरूप प्राप्त होऊ लागले. ती बहुजनसमाजाची चळवळ बनू लागली. सर्व सामाजिक विकासाची प्रेरक शक्ति अशी जी अज्ञात क्रांतिकारी प्रेरणा ती त्या चळवळीच्या द्वारे व्यक्त होऊ लागली. या उपर हिंदी राष्ट्रवाद्यानी सनदशीर सुधारणा, सनदी नोक-यांचे हिंदीकरण इत्यादी मागण्यांची भाषा अजिबात् सोडून दिली. प्रचलित वस्तुस्थितीत कसा आमूलाग्र बदल घडून येईल या संबंधाचा दृष्टिकोण बहुजन समाजापुढे मांडणे अवश्य होऊन वसले. स्वराज्यप्राप्तीने बहुजनसमाजांच्या दैनंदिन जीवनात कशी प्रचंडक्रांति घडून येईल हे त्या समाजास समजावून देणे जरूर वाटू लागले. जनतेला सामाजिक क्रांतीची स्पष्ट कल्पना देण्याची जरूरी निर्माण झाली. ती क्रांति घडवून आणण्यास प्रचलित सरकारच्या जागी जनहितानुवर्ति असे लोकसरकार उभारावे लागते; सर्व राष्ट्राच्या कल्याणाच्या अगर प्रगतीच्या आड जे सामाजिक संबंध किंवा ज्या सामाजिक संस्था येतील त्यांचे निर्मूलन या अभिनव जनसरकारने केले पाहिजे इत्यादि ऐतिहासिक अवश्य गोष्टींची जाणीव जनतेमध्ये निर्माण करणे जरूर भासू लागले. सारांश, जे राज्ययंत्र अखिल हिंदी जनतेचे जीवन अधिकाधिक सुखावह आणि विकसित करू शकेल अशाप्रकारचे राज्ययंत्र, प्रचलित साम्राज्य राज्ययंत्राऐवजी,स्थापन करप्याची ऐतिहासिक आवश्यकता आणि अज्ञात प्रेरणा हिंदी समाजात प्रादर्भत