पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ८६ देशभर भडका उडाला. नेमस्तांचे धाबे दणाणले. त्यानी ब्रिटिश साम्राज्यशाहीकडे धाव घेतली, आणि जाहीरनामा काढून हरताळाचा निषेध केला. मुंबई अहमदाबाद वगैरे औद्योगिक केन्द्रात हरताळ यशस्वी झाला. पंजाबामधील युद्धामुळे अत्यंत गांजलेल्या जनतेत चळवळीला ऊत आला. म. गांधी पंजाबच्या वाटेवर असता त्यांना पकडण्यात आले. अहमदाबादेतील ५० हजार कापड कामगार आणि रेल्वे कामगार खवळला, पंजाबात सैन्य नेता येऊ नये, ह्मणून आगगाडीचे रस्ते उपटून काढण्यात आले. चळवळीला जोम चढला. बहुजनसमाज दंगाधोपा करून हिंसा करतो या सबबीवर गांधीनी रौलेट बिलविरोधी सत्याग्रह तहकूब केला. आणि जनतेच्या उत्साहावर विरजण घातले. यावरून एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की गांधीजी हे बहुजनसमाजाचे पुढारी ह्मणून पुढे सरसावले असले तरी त्याना, हिंदी भांडवलशाहीचे पुढारी जे नेमस्त त्यांच्याप्रमाणेच सामान्य जनतेच्या उठावाची भीति वाटते आणि भांडवलशाही मालमत्तेची काळजी ही पण लागून राहते. | एकंदरीत आतापर्यंतची हिंदी राष्ट्रवादी चळवळ ही-मग ती पुरोगामी राष्ट्रवादाची असो किंवा प्रतिगामी राष्ट्रवादाची असो-हिंदी भांडवलशाहीच्या प्रगतीची चळवळ होय ! दोन्हीहि राष्ट्रवाद्यांचे प्रयत्न प्रमुखपणे हिंदी यांत्रिक धंदे वाढण्यासाठी होते. त्यांच्या कार्यक्रमांत बहुजनसमाजाच्या मागण्या प्रतिबिंबित झालेल्या नव्हत्या. प्रातिनिधीक संस्था, आर्थिक स्वायत्तता, देशाच्या राज्यकारभारात उच्च अधिकारी जागा, आयात मालावर अकाती इत्यादि मागण्या फलद्रूप झाल्यापासून हिंदी भांडवलशाही आणि बुद्धिजीवि मध्यमवर्ग यांचाच तितका उत्कर्ष होण्याजोगा होता; बहजनसमाजास कोणतीच फलनिष्पति होण्याजोगी नव्हती. पुरोगामी राष्ट्रवादी नेमस्त काय किंवा प्रतिगामी राष्ट्रवादी जहाल काय, दोहोंची मजल बरील मागण्यापलिकडे गेली नाही. जहाल मंडळी हीसुद्धा हिंदी संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे गोडवे गात असता, राजकार