पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ गांधीवाद रौलेट बिलाच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीने पत्करले.तोपर्यंत हिंदी राजकारणाच्या आखाड्यात ते उतरलेले नव्हते. गांधीनी बहुजनसमाजाच्या चळवळीचा अनुभव दक्षिण आफ्रिकेत मिळविलेला होता. चंपारण्यातील शेतक-यांच्या चळवळीत काम करीत असता त्याना बहुजनसमाजाच्या मनोवृत्तीची चांगलीच कल्पना आलेली होती. गांधीच्या या अनुभवाचा फायदा रौलेट बिल विरोधी चळवळीस झाला, युद्धोत्तर खेडा चंपारण्यातील शेतक-यांच्या चळवळी आणि ठिकठिकाणी हिंदुस्थानामध्ये अश्रुतपूर्व असे घडून येत असलेले कामकन्यांचे संप यामुळे बहुजनसमाजात किती कमालीचा असंतोष माजला होता याची स्पष्ट कल्पना येते. या असंतोषात रौलेट बिलाची ठिणगी पडली. जहाल मवाळ हिंदुमुसलमान इत्यादि सर्व एक झाले, आणि त्यानी बिलाचा कसून निषेध केला. आतापर्यंत सभा भरवून सरकार विरोधी ठराव अगर निषेध करण्यापलिकडे कोणताच मार्ग हिंदी जनतेस अवगत नव्हता. नाही ह्मणायला १९०४ ते ८ पर्यंतच्या कालावधीत वंगभंगोत्तर झालेली चळवळ प्रत्यक्ष प्रतिकाराची होती यात शंका नाही.परंतु तिची झळ बंगाल महाराष्ट्राबाहेर पसरलेली अशी दृग्गोचर होत नाही. तिचे क्षेत्रही कनिष्ठ मध्यम वर्गापुरतेच मर्यादित होते. तिच्यात बहुजनसमाज सामील झालेला नव्हता. परंतु या रौलेट बिल विरोधी लढ्यात बहुजनसमाजास पाचारण करण्यात आले होते.रौलेट कायद्यासारखे कायदे मोडण्यासाठी हिंदी जनतेने शपथा घेण्यास प्रारंभ केला. देशभर हरताळ पाळण्यात आला. दडपशाहीचे कायदेहि मोडण्यात आले. हरताळाने राष्ट्रीय संपाची किंबहुना असहकारितेच्या चळवळीचीच मुहूर्तमेढ रोविण्यात आली. हरताळ यशस्वी होण्यास बहुजनसमाजात पसरलेला असंतोष हाच वस्तुतः कारण होता. पुढे बहुजनसमाजाच्या या असंतोषाच्या प्रचंड लाटेतूनच पंजाब प्रकरण उद्भवले. सारांश, असंतोषरूप दारूची कोठारे देशभर विखुरलेली होती. म. गांधीने या असंख्य कोठारावर ठिणग्या फेकण्याचे तेवढे कार्य केले,