पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिगा। राष्ट्रवाद सैनिक यूरोपच्या रणक्षेत्रावर लढाईस गेले होते. त्यानी यूरोपमधील शहरातील आणि खेड्यातीलसुद्धा राहणीचा उच्च दर्जा प्रत्यक्ष अवलोकिला होता. हे शिपाई जेव्हा यूरोपहून : हिंदुस्थानास परतले, त्यावेळी त्यानी आपल्या अनुभवाचा प्रसार हिंदी खेडोपाडी करण्यास प्रारंभ केला. यामुळे हिंदुस्थानात सर्वत्र अभूतपूर्व असे असंतोषाचे आणि क्रांतीचे वातावरण निर्माण होऊ लागले. सारांश, आतापर्यंत असंतोष हा मध्यम वर्गापुरताच मर्यादित होता, तो आता वर वर्णिल्याप्रमाणे खेडोपाडी सर्वत्र बहुजनसमाजात पसरू लागला. हिंदी ग्रामीण जनतेच्या दैवाधीन वृत्तीला त्याने जबरदस्त धक्का दिला. ही वस्तुस्थिति ही काही, पुरोगामी राष्ट्रवादी नेमस्तांच्या किंवा प्रतिगामी राष्ट्रवादी जहालांच्या चळवळींचा परिपाक हाणून प्रादुर्भात झालेली नव्हती. युद्धोत्तर जगातील सामाजिक शक्तींच्या आंदोलनांचा तो परिणाम होता ! तेव्हा नेमस्ताना खूप करून अगर जहालाना तुरुंगात डांबून आता कार्यभाग होण्याजोगा नव्हता. जनतेच्या प्रचंड उठावाची भयदायक चिन्’ जी सर्वत्र दृग्गोचर होत होती, ती काही केवळ साम्राज्यशाही पिळणुकीचा परिणाम ह्मणून नव्हे, तर त्यांना हिंदी भांडवलदाराची पिळणूक ही सुद्धा तितकीच जबाबदार होती. जहालानी या वस्तुस्थितीचा फायदा घेऊन बहुजनसमाजाच्या उठावाचे नेतृत्व पत्करून त्यात ब्रिटिशविरोधी भावनेचे वातावरण निर्माण केले. एकंदरीत काँग्रेसपिते नेमस्त हे जरी तिला सोडून गेले, तथापि वहुजनसमाज आता काँग्रेसमध्ये सामील झाल्याने ती एक प्रचंड शक्ति बनली होती. याप्रमाणे हिंदी राष्ट्रवादाची चळवळ प्रचंड स्वरूप धारण करीत असता, ती हाणून पाडण्यासाठी सरकारने दुधारी तरवार हाती घरली. एका हाताने माँटेग्यूचेमस्फल्ड सुधारणा द्यावयाच्या आणि दुरुन्या हाताने रौलेट कायद्याचा सोटा चाल करावयाचा असे दुहेरी धोरण प्रचलित १४