पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवादे ܘܝܳ राजकीय हक्क आणि आर्थिक सवलती देणे साम्राज्यशाही मुत्सद्याना भाग पडले. पुढे १९१८ मध्ये माँटेग्यूचेमस्फल्ड सुधारणांचा कच्चा खड बाहेर पडला. या खड्यने नेमस्तांची तृप्ति झाली. पण लो. टिळकानी * उजाडले पण सूर्य कोठे आहे ? ' ' बेटा जनाब ! देहल्ली तो बहुत दूर है' इत्यादि केसरीत अग्रलेख लिहून सुधारणा निराशाजनक आहेत असे दिद्र्शन केले. बंगालचे दास आणि पाल आणि मद्रासचे सत्यमूर्ति यानी लो. टिळकांना साथ दिली. याचा परिणाम असा झाला की नेमस्त मंडळी काँग्रेसमधून फटून बाहेर पडली आणि त्यानी नॅशनल लिबरल फेडरेशन नावची नवीन राजकीय संस्था उभारली. यावेळी हिंदुस्थानात आणखी एका नवीन वस्तुस्थितीचा प्रादुर्भाव दृग्गोचर होऊ लागला होता. हिंदी बहुजनसमाजात असंतोषाचे वारे पसरू लागले. आर्जवाने वागणारी हिंदी भांडवलशाही आणि तिचे नेमस्त पुढारी यांची भीती सरकारला कधीच वाटली नाही. प्रतिगामी राष्ट्रवाद्यांच्या निष्फळ आणि निरर्थक चळवळींची सुद्धा सरकारने केव्हाही कदर बाळगली नाही. केवळ नेमस्तांचे समाधान करून सरकारचे भागेना. चार वर्षाच्या युद्धकालात सतत चाललेल्या पिळणुकीमुळे जनता गांजली होती. त्यांच्या परंपरागत सहनशीलतेवर या काळाइतका कधीही ताण पडलेला नव्हता.नवीन औद्योगिक केन्द्र स्थापन होऊन तेथे दलित जनतेची खेचाखेची होत होती. पूर्वीच्या तिच्या खेडूत राहणीपेक्षा सांप्रतचे तिचे नागर जीवन तिला असह्य बनत चालले होते. युध्दारंभी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात काम करणारे हिंदी कामगार आपल्या मायदेशास परतले होते. त्यानी अमेरिकेत उच्च राहणी अनुभविली होती. शिवाय अमेरिकेतून क्रांतिकारी राजनैतिक कल्पना ही कामगार मंडळी आपल्याबरोबर घेऊन येऊन त्यांचा ती हिंदुस्थानात प्रसार करीत होती. याखेरीज दहा लक्षापेक्षा अधिक हिंदी