पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७३) सुमेरी राशींचे चित्र. या चित्रांत सुमेरी राशींची चित्रे दिली आहेत. वरच्या भागांत डाव्या हाताला पहिल्याने कुंभ-(धर पुरुष ) असून, त्याच्या शेजारी बकरा मकराकृतींचा दर्शक आहे. त्याच्या पुढे हातांत धनुष्यबाण घेतलेला अर्ध-नर आहे. खालच्या भागांत खेकडा ( कर्क), सिंह, वृश्चिक, वृषभमधील बैलांची शिंगें डाव्या बाजूच्या कोपऱ्यास दिसत आहेत. इतर एकदोन आकृत्या आहेत, त्या अस्पष्ट आहेत.] राशींच्या या चित्रांवरून व वर्णनावरून सांप्रतच्या एका महत्त्वाच्या वादाचा मात्र उत्तम रीतीने निकाल लागतो. त्याचा उल्लेख येथे करणे अवश्य आहे. तो वाद म्हणजे सायन-निरयण-वाद होय. ग्रीक लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी आपल्यामध्ये राशी नव्हत्या, ही गोष्ट आतां सर्वमान्य झाली आहे. ख्रिस्तपूर्व ४ थ्या अथवा पांचव्या शतकांत हल्लींच्या स्वरूपांत महाभारताचे शेवटचे संस्करण झाले त्यांत राशींचा उल्लेख नाही, परंतु त्यानंतर थोड्याच दिवसानंतर झालेल्या बौधायनाचें मीनमेषयोर्वसन्तः । हे वचन कालमाधवांत दिलेले आहे, त्याचप्रमाणे हाहींच्या स्वरूपात वाल्मीकिरामा- यणाचे संस्करण निस्तपूर्व दुसऱ्या शतकांत झाले, त्यांतहि रामाचा जन्मकाल राशी- मानांत दिलेला आहे. या सर्वांवरून राशींचा हिंदुस्थानांतील प्रवेशकाल निश्चित करता येतो. या राशी ग्रीस देशांतून हिंदुस्थानांत आल्या, इतकी गोष्ट आजपर्यंत ज्ञात होती,