पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७२) युगपद्धतीच्या कालगणनेचा मूळ एकच आधार असला पाहिजे हे उघड होते. ब्राऊनच्या या निष्कर्षापेक्षा आमच्या या लेखमालेतील मौलिक सिद्धांताला अधिक महत्त्वाचा पोषक आधार दुसरा कोणता पाहिजे? या युगपद्धतीनंतर ओघानंच साम्यवर्णनदृष्टथा हिंदी व सुमेरी पद्धतींतल ज्योतिषविषयक साम्य येते. या साम्याची सर्वसाधारण कल्पना येण्याइतकी माहिती या मालेच्या पहिल्याच लेखांकांत दिली आहे. येथे तद्व्यतिरिक्त अधिक सूक्ष्म अशी थोडीशी माहिती देत आहे. __अगदी आद्य अशा ज्ञातकालापासून सुमेरिअन लोकांना आकाशांतील ग्रहांची व ताऱ्यांची चांगली माहिती होती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत अर्थातच त्यांना माहीत नव्हता. त्यांची समजूत अशी असे की, सूर्य हा पृथ्वीमावती एखाद्या उडत्या पक्ष्याप्रमाणं अथवा एखाद्या नावेप्रमाणे फिरत असतो. त्याच्या फिरण्याची दिशा नेहमीं पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी असते व असा फिरत असतां तो दक्षिणोत्तर असा घड्याळ्याच्या लंबकाप्रमाणे हेलकावे खातो. हे त्यांच्या ध्यानात आले होते पृथ्वीभोवतीच्या या सूर्याच्या मागाला त्यांनी circle of Necessitr.'अपरि. हार्यवर्तुल' असें नांव दिले होते. हेच क्रांतिवृत्त होय. या क्रांतिवृत्ताचे सुमेरी ज्योति- पांनी बारा भाग पाडले होते. त्याच राशी होत. या राशीत सूर्याचा प्रवेशकाल त्या राशींची समेरी नांवे व बणेन व त्यांचा अलीकडील नांव खालील कोटकांत दिली आहेत अर्वाचीन राशिनामें । सूर्यप्रवेशाचा दि. व म. सुमेरी वर्णन खेकडा. १ मेष (एडका) |२० मार्च ऊर्फ निसान दूत (सुमेरी). २ वृषभ (बैल) २० एप्रिल " अय्यर स्वर्गातील बैल. . ३. मिथुन (स्त्री-पुरुषयुग्म १ मे "सिब्वान् दोन जुळी मुले ४ कर्क (खेकडा) २१ जून ऊर्फ तम्मूझ ५/ सिंह (सिंह) २२जले." आबू जंगी का ६) कन्या (स्त्री) २३ ऑगस्ट” एलल हातांत धान्याचे कणीस धारण करणारी स्त्री. तुला (तराजू ) २३ सेप्टेंबर "तिनी तराजू. ८ वृश्चिक ( विंचू ) २२ आक्टोबर" माचे- तमोमय वृश्चिक.. Term स्वान् धन (धनधारी पुरुष) २२ नोवेंबर " चिइल अधाश्व-अधनर, धनुधारी. १०'मकर ( बोकड) २१ डिसेंबर तेबेत | इआ देवीचा अधा-बोकड, अधा-मासा, असा प्राणी । ११ कभ ( कुंभवरपुरुष) १९ जानेवारी"सेवात कुंभ धारण करणारा देव. १२मान ( मासे) 1१८ फेवारी " आदर कालन्यातील दोन मासे.