पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७४) परंतु ग्रीसमध्ये त्या कोठून व कशा आल्या हे मात्र नक्की झाले नव्हतें: तें आतां या समेरी वाङ्मयाच्या शोधनाने कळून आले. तथापि ज्या अर्थी या राशी हिंदी वेदिक वाडायांत नाहीत, त्या अर्थी सुमेरी व हिंदी अशा शाखा मूळ उत्तरप्रवस्थ मानव- वंशाच्या पडून त्या त्या देशांत त्या स्थिर झाल्यानंतर, सुमेरियांत राशींची कल्पना आली हैं उघड आहे. तथापि राशाचा मूळाधार असलेल्या चक्राचा आरंभ सूर्य प्रत्य- क्षतः सायनगणनेप्रमाणे ज्यावेळी नवीन राशीत प्रवेश करितो, त्यावेळी झालेला समेरियांत मानलेला आहे. यावरून प्राचीन काळचा आधार पहातांहि पूर्वीची काल- गणना निरयण अथवा स्थिरतारात्मक नसून सायन अथवा प्रत्यक्षमूलक होती है निश्चित होते. असो. याप्रमाणे सुमेरियांतील राशीवर्णन केल्यावर थोडेसें आपण ग्रहांच्या संबंधाच्या माहितीकडे वळू. यांची संख्या सात असल्याबद्दल त्यांची अत्यंत प्राचीन- काळापासून समजूत असून त्यांचे स्वभावधर्महि प्रसिद्ध होते. रवि व चंद्र यांचे वर्णन मागे येऊन गेलेच आहे. बुधाचें नांव मूळ सुमेरी भाषेत नेबो व बॅबिलोनी भाषेत गट असें आहे. व तो देवांचा दूत आहे अशी समजूत होती. त्याचप्रमाणे ज्ञाता अथवा जो बुधः ) म्हणजे मनुष्यजातीचा शिक्षक ('Instrunctor of mankind') आहे असेंहि मानण्यात येई. मंगळाचें नांव नेरगाल अथवा मुस्तवलं असेंहि होते. हा ग्रह ( planet of evil, plague and dcath') दुःख, रोग. व मृत्यु यांचा दर्शक मानला जाई. गुरूला उमुन्पा? म्हणत व त्यालाच पुढे मर्डक असेहि म्हणत. म्हणजे इंद्रसमान मडुक व गुरु यांच्या गुणधमांचे मिश्रण त्यांत झालेले आहे. उकाला दिलबत् म्हणत व त्याचे इइतर देवाशी ऐकात्म्य मानलेले आहे. हा ग्रह शुभ मानलेला असे. शनीला सुमेरी भाषत निरिगू अथवा निनिपू म्हणत व पुढे त्यासच कैमनु असे नांव बॅबिलोनी भाषेत पडले. हा दुःख व संकटें दर्शवितो. छूटार्क या ग्रंथ काराने वरील सातहि ग्रहांचा अंमल जन्मकाली मनुष्यावर होत असल्याबद्दल खाल्डियन सिरी) लोकांत असलेल्या समजुतींचा आपल्या ग्रंथांत उल्लेख केला आहे. तो म्हणतो:- • Respecting the planets which they call the birth-ruling aivinities, the chaldeans lay down, that the two planets Venus and Tamiter are propitious, and the two (Nars and Eaturn ) malign and hathree (sun, moon and mercury) of a middle nature and com- mon. i. e.these are propitious with the good and malign with the bad." " सप्तग्रहांना खाल्डिअन लोक जन्मकालाधिष्टाव्या देवता मानीत. त्यांपैकी गुरु व शुक हे ग्रह त्यांच्या मते शुभ असत, शनि व मंगळ पाप असत व बाकीचे तीन ( रवि, चंद्र, व बुध ) मध्यम असत, म्हणजे शुभग्रहाच्या संबंधाने ते शुभफल देतात व पापग्रहांच्या संयोगाने पापफल देतात.". - आपल्या इकडील ज्योतिषांतहि सातच ग्रह मानीत. त्यांपैकी रवि व चंद्र है दोन स्वतंत्र वर्णिले असून बाकीच्या पाचांचा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाच्या १०५ सूक्तांत आलेला आहे:-