(१२२)
हाच चमत्कार सुमेरी वाङ्मयांतहि रूपकानें जशाचा तसा वर्णिला आहे हे किती
विलक्षण आहे ! सुमेरी वाल्मयांत वसंतऋतूंतील सूर्याला 'तम्मूझ' असे
नांव असे. हिवाळ्यांत हा तम्मूझ मारला जातो व पाताळांत तो
नाहीसा होतो व प्रतिवर्षी वसंतागमी इश्तर देवी त्याच्या शोधार्थ
पाताळांत जाते व त्याला वर घेऊन येते, असे वर्णन आहे. तम्मूझ
हिवाळ्याच्या आरंभी मेल्यावर इश्तर शोक करिते:-
Oh Tammuz, the spouse of thy youth,
Thou didst lay affliotion every yoar.
(हे तम्मुझ, तुझ्या यौवनावस्थेतील या तुझ्या भार्येवर प्रतिवर्षी तूं संकट
आणतोस.)
Oh horo, my lord, ah me! I will say;
Food I eat not, water I drink not,
Because of the exalted one of the nether-world.
(हे वीरा, हे स्वामी, हायर ! माझ्यावर पातालाधिपतीने आणलेल्या
या संकटामुळे दुःखाने मी अन्न अथवा पाणी कांहीं ग्रहण करणार नाही.)
He has gone, he has gono, to the bosom of the earth,
and the dead are numerons in the land,
Men are filled with sorrows,they stagger by day in gloom
In the month of thy year which brings not peaces
thou hast.gone.
( हाय, हाय ! तो ( तम्मूझ ) गेला ! तो पृथ्वीच्या उदरांत (पातालांत)
गेला । त्या प्रदेशांत असंख्य मृत लोक आहेत. पण इकडे पृथ्वीवर त्याच्या जाण्याने
सर्व लोक दुःखांत मग्न झाले आहेत. भर दिवसां ते अंधेरांत चांचपडत आहेत.
हे तम्मूझ, प्रतिवर्षी ज्या महिन्यांत लोकांना सुख मिळत नाही, त्याच
महिन्यांत तूं गेलास.)
The wailina is for the herbs, the first lament is
they are not produced,
The wailing is for the grain, ears are not produced.
( दुःखाचे कारण हे की, त्या काळी वनस्पती उत्पन्न होत नाहीत, धान्यासाठी
दुःख होते, कारण धान्याची कणसें उत्पन्न होत नाहीत, )
तेव्हा ,
How long shall the springing of Verdure be restraimed? How
long shall the putting forth of leaves be held back?
हिरवेगार असें कोवळे गवत उगवण्याला अजून किती अवधि लागणार?
वृक्षांना नवपल्लव भेण्याचे अजून किती लांबणीवर पडणार? )
परंतु अशा रीतीने शोकभूमि झालेला तम्मूझ थोड्याच दिवसांत पुन्हां जिवंत
झाला ! कवि म्हणतो:--
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२६
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
