पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२१) अनारंबण (निरालंब ) व तमसि ( अंधकारमय ) अशा जलांत बुडला असता त्याच अश्विनानी त्याला बाहेर काढले. त्याचप्रमाणे खुद्द सूर्य हाहि अंधकारांत बुडल्याचा उल्लेख ऋग्वेदांत केला आहे:- सूर्य विवेद तमसि क्षियन्तम् । । सूर्य न दत्रा तमसि क्षियन्तम् ॥ अशा अर्थाचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे सूर्याचें एक चक्र इंद्राने हरण केलें असें वर्णन करून, सूर्य हेच ते सूर्याचे एक चक्र, असे सांगितले आहे; व तें चक्र पुन्हां मिळाल्यावर सर्वत्र प्रकाश पडल्याचा उल्लेख, मुषाय सूर्य कवये चक्रमीशान ओजसा । ऋ.वे.१-१७५-४ इत्यादि सूक्तांत केला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका ठिकाणी सूर्यस्वरूपी विष्णूला एक प्रकारचा असाध्य असा त्वचारोग झाल्यामुळे त्याला 'शिपिविष्ण' अथवा कुष्टरोगी असे म्हटले आहे व पुढे तो त्याचा रोग हिमकालानंतर बरा झाल्यावर तो पुन्हां तेजःपुंज अशा त्वचेचा होतो, असे ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाच्या १०० व्या सूक्तांत म्हटले आहे. या सर्व सूक्तांतून समुद्रात बुडलेल्या अगर त्वचारोग झाल्यामुळे विवर्ण झालेल्या व्यक्तींचे केलेले वर्णन म्हणजे वस्तुतः हिमकाली ध्रुवप्रदेशी अदृश्य असलेल्या अथवा Sear Sumevian Phonetic X.DA KAN,PAN MARAHTAR wA क. में ves BanR No.x. STOR nahati वाचनः-कण्व-गु-शि-कि-अस्. अर्थः-शिकी येथील कण्व ( याची मुद्रा ). कींच्या थोड्या काळपर्यंत निस्तेज झालेल्या सूर्याचे वर्णन आहे. अर्थात् वसंता हा सूर्य उदय पावला म्हणजे त्याला समुद्रांतून वर काढले अथवा त्याचा त्वचा. जाऊन तो कांतिमान झाला, असाच या कथांचा अर्थ आहे, व हा चमत्कार प्रवप्रदेशीच संभवतो, अशी टिळकांची उपपत्ति आहे. फक्त ध्रुवप्रदेशी