पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२३) (Apparently, it was believed that Tammuz returned and grew into full manhood in a comparitively brief period ! A couplet from the Taimmuz hymn says torsely:- In his infanoy in a sunken boat he lay, In his manhood in the Submerged grain he lay. (बालपणीं पातालांतल्या होडौंत बुडून गेलेला तम्मूझ , यौवनांत सर्वत्र धान्य- समृद्धि झाल्यामुळे धान्याच्या आगरांत बसला !) इतके उतारे पुरे आहेत. यावरून प्रतिवर्षी हिमकाळी सूर्य हा पाताळांत बुडून गेल्याप्रमाणे (वैदिक कथेतील “ अप्स्वंतः अनारंबणे तमसि प्रविद्धं । ) नाहीसा होत असे. त्या वेळी लोक दिवसाढवळ्या अंधारांत चांचपडत व दुःखमग्न होत, धान्य वनस्पति उगवत नसत; व मग वसंतारंभी तो सूर्य पुन्हां क्षितिजावर येतो. त्या वेळी सर्व सृष्टीला नवचैतन्य येते, असा या तम्मूझच्या कथेचा अर्थ आहे. याच कथेवरून पुढे ग्रीक वाङ्मयांत 'डिमीटर व पर्सिफोनी' ची कथा व स्कँडेनव्हि- अन् बाबायांतील 'डायरमीड ' ची कथा यांचा उद्भव झाला आहे. पहिल्या कथेत भूमिदेवता डिमीटर हिची अत्यंत सुंदर कन्या पसिंफोनी उर्फ प्रॉसपाईन हिला पाताळाच्या देवाने पाताळांत उचलून नेले. तिचा पत्ता डिमीटरला लागेना तेव्हां ती (डिमीटर) फार दुःखी झाली. त्यामुळे तो भूमिभाग तिच्या शापाने शुष्क होऊन गेला, सर्व झाडे मरून गेली व तेथील सर्व जीवहि मरूं लागले. पुढे तिला आपली मलगी पाताळांत असल्याची खबर मिळाल्यावरून तिने स्वर्गाधिपति ज्यपिटरची प्रार्थना केला. त्यावरून ज्यूपिटरने पाताळांत प्लूटोकडे मयुरी (बुध ) व वसंत ( ऋतु) यांना पाठविले. ते पाताळांत जाऊन पहातात, तो पर्सिफोनीने तेथें जरी अन्नग्रहण केले नव्हते, तरी त्या ठिकाणच्या एका डाळिंबाचे चार दाणे तिने खाल्ले होते. यामुळे तिची पाताळांतून कायमची सुटका होणे अशक्य झाले. पण अशी तडजोड करण्यांत आली की, तिने वर्षांतून सहा महिने पृथ्वीवर आपल्या आईजवळ रहावे व बाकीचा वेळ तिने पाताळांत आपल्या नवऱ्या- बरोबर घालवावा. या कथेतील जाड अक्षरांचे वाक्य फार महत्त्वाचे आहे. डिमी- टर म्हणजे पृथ्वीदेवता व पर्सिफोनी म्हणजे ' मधुमासश्री' हे सर्व युरोपीय गाथा- शाखयांनी मान्य केले आहे. परंतु 'पर्सिफोनीने सहा महिने पृथ्वीवर रहावें व बाकीचा काळ पाताळांत काढावा' असा करार झाल्याचे या कथेत का दशविले आहे, त्याचा खुलासा त्यांच्यापैकी कोणालाहि करता आलेला नाही. आमच्या मते याचा खुलासा स्पष्ट आहे की या कथेत ध्रुवप्रदेशाची ऋतुमानाची स्थिति वर्णिली आहे. तेथेच हा सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असा चमत्कार दिसू शकतो. टिळक म्हणतात त्याप्रमाणे, - According to the Vermal theory, the sun may be supposed to be below the horizen for any period varying from one to one hundred mights, or even six months ( Arctic Home, pg. 306)