पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेल्या व नवीनच ज्ञात झालेल्या संबंधाच्या दृष्टीने प्रो. अविनाशचंद्र दास अगर रा. पावगी या दोघांनीहि आपली उपपत्ति मांडलेली नसल्याने या उभयसंस्कृतीचे आद्य- स्थान कोणते, हा प्रश्न त्यांच्यापुढे नम्हताच. फक्त वैदिक आर्याचे मूलस्थान कोणते, इतक्याच प्रश्नाचा विचार करून त्याचे उत्तर हिंदुस्थान असे या दोघांनी दिले आहे. परंतु ते वरील विवेचनावरून टिकण्यासारखें नाहीं. असें आतापर्यंत दाखविले आहे. याप्रमाणे पहिल्या दोनहि पक्षांची वासलात लावल्यावर आता फक्त तिसरा पक्ष उरला. तो हा की, सुमेरी व हिंदी या दोनहि संस्कृतींचें सामान्य मूल व स्थान तिसरेंच एक आहे, व तेथून या दोनहि शाखा दोन निरनिराळ्या देशांत गेल्या. या पक्षाचा मोघम पुरस्कार प्रो. मॅकेंझी सारख्या पंडितांनी केला आहे. परंतु हा उभय- सामान्य देश कोठे असावा याबद्दलची चिकित्सा त्यांनी केली नाही. दुसऱ्या अनेक पंडितांनी या संबंधी चर्चा केली आहे. त्याबद्दलचे त्रोटक विवेचन सारांशरूपाने 'महाराष्ट्रीय ज्ञानकोशा'च्या 'बुद्धपूर्व जगत्' या भागांत केले आहे, ते आटोपशीर असल्याने येथे साभार उद्धृत करीत आहों, तें येणेप्रमाणे:- "आर्यन् वंश-ज्याला काकेशिअन वंश असेंहि म्हणतात त्या मानव- वंशापासून निघालेल्या अनेक शाखा आज युरोप व आशियांत उतरलेल्या आहेत, असे भाषादिशास्त्रांच्या तौलनिक अभ्यासाने सिद्ध झाल्यावर हा मूळ आर्यवंश शाखा फुटण्यापूर्वी कोठे रहात होता, या प्रश्नासंबंधाने विविध मते पुढे आली आहेत. त्यांत. काही विद्वान् मध्ययुरोप हे मूलगृह मानतात, तर काहीं मध्य आशिया हे मानतात." या संबंधाने प्रथम अडॉल्फ पिक्टेट याने १८५९ मध्ये आपले मत पुढे मांडले. आशियांतील बॅक्ट्रिया नामक प्रदेशांत मूळ आर्य लोक रहात होते. अस त्याचे म्हणणे आहे. मूलगृहाचा निश्चय करतांना ऋतुमानाचा पुरावा आधाराला घेण्यात आला. इंडो-युरोपियनांना हिवाळा, वसंतऋतु व उन्हाळा, हे फक्त तीन ऋतु माहीत होते आपण जो जो उतरेकडे जातो, तों तों तेथें फक्त उन्हाळा व हिवाळा असे दोनच ऋतु असतात. तर उलट पक्षी दक्षिणेकडे तीन, चार किंवा पांच हताहि होतात. तेव्हां तीन ऋतू ज्या अक्षांशावर असतात, अशा वक्ट्रिया देशांत ऑक्सस नदीनजीक आयांचे मूलगृह असावें, असें पिक्टेटचे म्हणणे आहे. या मताला पुष्टि म्हणून बॅक्ट्रियांत आढळणारे खनिज पदार्थ, वनस्पती व प्राणी, इंडो-युरोपियनांना माहीत होते, असे त्याने सिद्ध केलें." “याच्या अगदी उलट इंडो-युरोपीय लोकांचे मूलगृह यूरोपमध्ये होते. असे लेथम् , बेनी, व्हिटने वगैरे विद्वानांनी मत दिले. लॅथमचे म्हणणे असे की, संस्कृत भाषेचा लिथुएनियन् , स्लॅव्होनिक, लॅटिन् , ग्रीक व जर्मन या भाषांशी फार संबंध आहे. म्हणून लिथो स्लॅव्होनिक भाषांचा देश जो मध्ययुरोप, तेथून संस्कृतभाषा बोलणारे लोक हिंदुस्थानाकडे आले असणे अधिक संभवनीय आहे. गायजर याने तर