पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंका रहात नाही. अर्थर्ववेदांत प्रलयकालाचा स्पष्ट उल्लेख आहे, व त्या वेळी मनूला तारणारी नौका, हिमालयाच्या शिखरावर सोमकुट वनस्पतीच्या उगमस्थानाजवळ लागली. असेंहि वर्णन तेथे आहे. ती अड्चा येणेप्रमाणे:- हिरण्ययी नौरवरद्धिरण्यबंधना दिवि । तत्रामृतस्यचक्षणं ततः कुष्टोऽजायत ।। यत्र नावप्रभ्रंशनं यत्र हिमवतः शिरः। तत्रामृतस्यचक्षणं ततः कुष्टोऽजायत॥ (अथर्व वेद १९-३९-८). तेव्हां रा. पावगींच्या मतें ऋग्वेदांत जलप्रलयाचे वर्णन नाहीं, तें अथर्ववेदांत आहे. अथर्व वेदाहुन ऋग्वेद प्राचीन आहे, त्या अर्थी ऋग्वेदाचा उगम जलप्रलयकाल- पती म्हणजे खि. पू ८००० वर्षांपूर्वी हिंदुस्थानांतच झाला. त्यानंतर वैदिक लोक हिंदस्थानांतून उत्तर ध्रुवाजवळ गेलं तेथ जलप्रलय झाला. (जलप्रलय उत्तर ध्रवा- जवळ झाला. तो दुसरीकडे कोठे झाला नाही, हे रा. पावगी यांना मान्य आहे ) जलपलयामळे आयर्यांनी ध्रुवप्रदेश सोडला व ते परत हिंदुस्थानांत आले. तेथें अथर्व - काम झाला. अर्थात् या अथर्ववेदापूर्वी ध्रुवप्रदेशी झालेल्या जलप्रल- याचे वर्णन त्यांत आले आहे, हे उघड आहे. येणेप्रमाणे रा. पावगीको मत आहे. पावगींच्या विवेचनांत दोन गोष्टी अगदी निराधार मानल्या गेल्या आहेत हिंदस्थान कोठे व ध्रुवप्रदेश कोठे! तेव्हां हिंदुस्थानांतून वैदिक लोकका प्रदेशी का गेले. त्या काळी पंजाबची हवा हल्लीहून थंड आहे अशी तीतो प्रांत कसे झाले तरी समतीशोष्ण कटिबंधांतला आहे. तेव्हां तेथल्या पेक्षां ध्रवप्रदेशी हवा-ती हलींपेक्षा कितीहि उष्ण व बस्तियोग्य मानली तरी की पट अधिक थंड असली पाहिजे. तेव्हां आयेलोक येथून तेथें कांगेले? शिवाय ते तेथे हिंदुस्थानांतून गेले यालाहि काही आधार रा. पावगी देऊ शकत नाहींन उलट यावरून ते केव्हा तरी ध्रुवप्रदेशी होते ही गोष्ट जर रा. पावगी स्वतः कबल करितात, तर मग आयलोक हिंदुस्थानांतून ऋग्वेदकालानंतर उत्तरध्रवप्रदेशी गेले असा द्राविडी प्राणायाम मानण्यापेक्षा ते प्रथमपासूनच तेथें होते, व जलप्रलया- तर तो प्रदेश वस्तीला अयोग्य झाल्यामुळे हिंदुस्थानात आले, हेच म्हणणे अधिक किक होणार नाही काय? याला रा. पावगींच्या मते अडचण काय ती एवढीच की ऋग्वेदांत जलप्रलयाचा स्पष्ट उल्लेख नाही. परंतु तो नसला तरी ऋग्वेदांतला ऋतमान, हवामान इत्यादि अंतर्गत पुराव्यांवरून जर उत्तर ध्रवप्रदेशीय परिस्थितीचान मेळ पडू शकला, तर मग प्रत्यक्ष उल्लेखाचा अभाव हा काही फारसें बाधक प्रमा होऊशकत नाही. तेव्हां एकंदरीने विचार करितां रा. पावगी यांची ही पार कसोटीवर टिकण्यासारखी नाही. अर्थात् हिंदी संस्कृतीचा सुमेरी संस्कृतीशी अस.