पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० </12 हिंदी-सुमेरी संस्कृतीचें मूलस्थान व उपसंहार. . MR मेरिअन् लोकांमध्ये प्रचलित असलेल्या आख्यायिका व धार्मिक दंतकथा या युफ्रेटिस्-टायग्रिस् नद्यांच्या टापूं- तील सुमरिअन् संस्कृतीहूनहि अत्यंत प्राचीन आहेत व त्यांचा उगम कोठे तरी अजून अनिश्चित अस- लेल्या प्रदेशांतील संस्कृतीच्या कल्पनासंग्रहांतून झालेला आहे, असें प्रो. मॅकेंझीचे अनुमान या लेखमालेच्या चौथ्या लेखांकात दिले आहे. व त्यानंतर सुमेरी व हिंदी या उभय संस्कृतीच्या एकरूपत्वावरून त्या त्या समाजांच्या एकरूपत्वा- बद्दल काय निष्कर्ष निघतो हे पाहण्यासाठी आपण त्या दोनहि समाजांचें उपलब्ध शरीरवर्णन मानव-वंश-शास्त्राच्या तत्त्वांच्या विस्तृत विवेचनाने पडताळून पाहिले त्यांत हे दोनहि समाज अगदी एकरूप असल्याचा निष्कर्ष निघाला. तेव्हां आतां यो मॅकेंझीला अनिश्चित वाटणारा या उभय संस्कृतीचा मूलप्रदेश कोणता, हे या शेवटल्या लेखांत आपण पाहूं. दोन सारख्या दिसणाऱ्या भावांच्या समानत्वाचाच नुसता खल करून त्यांच्या विषयींची कौटुंबिक इतिहासाची स्पृहा तृप्त होत नाही; तर त्यांच्या वाडवडिलांचा तपास लागला म्हणजेच बुद्धीला समाधान वाटते. तशाच प्रकारे या दोनहि समाजांच्या मूळस्थानाचा पत्ता लावल्याशिवाय आपल्यालाहि समाधान प्राप्त होणार नाही. हिंदी व सुमेरी संस्कृतीच्या विलक्षण साम्यावरून त्यांच्या मूलाबद्दल तर्कत. तीनच पक्ष संभवतात. एक पक्ष सुमेरिआ हाच या संस्कृतीची मूळ भमि असन तेथन पुढे हिंदी शाखा फुटून हिंदुस्थानांत आली हा होय. दुसरा पक्ष असा की हिंदुस्थान हाच देश दोनहि संस्कृतींची मूलभामे असून तेथून सुमेरी शाखा फुटन समेरिआंत गेली व तिसरा पक्ष हा की, दोनहि संस्कृतींचे मूलस्थान तिसराच एक प्रदेश असून तेथून या दोन्हीं शाखा अनुक्रम सुमेरिआ व हिंद यामध्ये गेल्या या शिवाय चौथा पक्ष या प्रकरणी होऊच शकत नाही; या तीन पक्षांपैकी कोणता तरी एक खरा असला पाहिजे, या संबंधी मोठ्या चमत्काराची गोष्ट ही की. यांपैकी दरे उपपत्तीला पुरस्कर्ते मिळाले असून दरेकानें आपआपल्या उपपत्तीच्या समर्थनार्थकारणे दिली आहेत. पहिला पक्ष साधारणतः नवीनच उपस्थित झाला आहे. कारण