(११०)
रिआच्या संस्कृतीच्या अंगउपांगांचें संपूर्ण परीक्षण अगदी अलीकडे झालेले आहे.
तथापि या पक्षाचा मुख्य पुरस्कार वेंडेल यांनी केला आहे. दुसऱ्या पक्षाला बंगाली
विद्वान् श्रीयुत अविनाशचंद्र दास व महाराष्ट्रातील रा. नानासाहेब पावगी हे आहेत;
व तिसऱ्या पक्षाच्या पुरस्कारांत प्रो. मॅकेंझी हे वर म्हटल्याप्रमाणे पहिल्या दोन
पक्षांच्या विरोधापुरते आहेत. परंतु ते या दोनहि संस्कृतीची मूलस्थानभूत जागा सागू
शकत नाहीत. तें कार्य दुसऱ्या काही युरोपीय पंडितांनी व हिंदी गृहस्थांपैकी के.
लो. टिळक यांनी केले आहे. तेव्हां आतां यांपैकी दरेकाच्या म्हणण्याचा विचार
करून अखेरचा निर्णय निश्चित करावयाचे तेवढें कार्य उरलें आहे.
यांपैकी पहिल्या पक्षाचा विचार आता आपण करूं. तो पक्ष म्हणजे हिदा
वैदिक संस्कृति ही सुमेरी संस्कृतीची शाखा आहे. हा होय. त्यासाठी ज्या सुमरा
संस्कृतीची हिंदीसंस्कृति शाखा आहे असे मानावयाचे. त्या संस्कृतीचा अंतिम काळ
किमान नि. पू. ४५०० असल्याचा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे. तो कोणत्या
पद्धतीने हे आपल्याला प्रथम पाहिले पाहिजे. या पूर्वीच्या लेखांतून हें वर्णिलेच आहे
की. सुमेरी लोकांवर बॅबिलोनीयन् या सेमेटिक वंशाच्या लोकांनी स्वारी करून ता
प्रदेश जिंकला व तेथें आपलें राज्य सुरू केले. त्यानंतर नि. पू. २३०० च्या सुमारास
ईसिन् शहरी या बॅबिलोनी वंशांतील राजांच्या व लार्सा शहरी एलमाईट वंशाच्या
राजांच्या अमदानींत त्या काळच्या विद्वान् लोकांकरवी महाप्रलयापासून तो त्या
चालु काळपर्यंतच्या राजांच्या कारकीर्दीचे वंशक्रम व कालक्रम नक्की करण्यांत आले.
त्यासाठी प्रथमच्या कालाबद्दल दंतकथांचा व पुढील काळाबद्दल शिलालेखांचा आधार
घेण्यात आला होता. अर्थात् त्यांपैकी दंतकथांवर संपूर्ण विश्वास ठेवणे शक्य नाही.
शिलालेखांचा पुरावा मात्र निःसंदेह मानण्यासारखा आहे. अशा शिलालेखांपैकी
एक निप्पूर या सुमेरी राजधानीच्या शहरी इशसेन्चा चवथा राजा एनमिल-बनी
याच्या कारकीर्दीच्या अकराव्या वर्षी कोरलेला आहे. याच शिलालेखाची नकलहि
दुसऱ्या एका ठिकाणी उपलब्ध झाली आहे. या दोनहीवरून महाप्रलयापासून तों
या शिलालेख कोरण्याच्या कालापर्यंत म्हणजे त्रि. पू. २१९८ पर्यंत १३४ राजे झाले
व त्या सर्वांची कारकीर्द मिळून २८८७६ वर्षे होतात. आणखी एका शिलालेखावरून
१३९ राजे व त्यांच्या कारकीर्दाची वर्षे २५०६३ होतात. यांपैकी पूर्वीचे राजे
काल्पनिक आहेत. त्यांतील शेवटचे चार राजे किश् येथील सेमोटिक वंशाचे आहेत
म्हणजे यावरून नि. पू. ५००० च्या पूर्वी सुमेरियांत सेमेटिक राजे होते, असे
यावरून निष्पन्न होते. या वंशावळी जरी काही अंशी काल्पनिक असल्या तरी
त्यांच्यांत सत्याचाहि अंश बराचसा आहे. यावरून पहातां निदान नि. पू. ४५००
वर्षांपूर्वी ब बऱ्याच अंशी नि. पू. ५००० च्या सुमारास किश् येथील सेमेटिक वंशाचे
राजे राज्य करीत होते असे तज्ञांनी ठरविले आहे, व त्यापूर्वी सुमेरी राजवंश चालू
असल्याने सुमेरी संस्कृतची अलीकडील मयादा खि. पू. ५००० ही मानिली आहे.
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११४
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
